महाराष्ट्र

भाव वाढविणाऱ्यांवर कठोर कारवाईछगन भुजबळ

 मुंबई (मवृसे)लॉकडाउनचा फायदा घेत भाववाढ करून ग्राहकांना लुटणाèयांवर तत्काळ कठोर कारवाईचे आदेश अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी स्थानिक अधिकाऱ्यांना दिले. टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांची गय केली जाणार नाही, हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा इशारा तसेच काळाबाजार व भाववाढ होणार नाही, अशी हमी राज्यकत्र्यांनी दिल्यानंतरही उपराजधानीतील अनेक घाऊक व्यापारी, किरकोळ विक्रेत्यांनी लॉकडाउनचा फायदा घेणे सुरूच ठेवले आहे. एका वृत्तपत्राने शनिवारी याबाबत वृत्त प्रकाशित केले. त्याची भुजबळांनी गंभीर दखल घेतली. बाजारात मुबलक साठा असताना बèयाच वस्तूंचा तुटवडा असल्याची स्थिती आहे. परिणामी, ग्राहकांची चिंता वाढली आहे.

दुसरीकडे झपाट्याने भाव वाढवण्यात येत आहेत. फॉच्र्युन सारख्या ब्रॅण्डेड तेलाच्या भावात पंधरवड्यात लक्षणीय वाढ झाली. हीच स्थिती धान्याची आहे. भाववाढ करू नये, असे राज्यकत्र्यांनी वारंवार जाहीर केले. मात्र, त्यांच्या आवाहनाला कुठलाही प्रतिसाद न देता व्यापाèयांनी वाढ केली आहे. गहू, तांदूळ, तेल आदी वस्तूंचे भाव झपाट्याने वाढले. बटाटे, कांदे, लसूणचे भावही वाढवण्यात आले. त्याचा फटका सर्वसामान्य व मध्यमवर्गीयांना बसला आहे.

दरम्यान, भुजबळ यांच्या कार्यालयाने सोमवारी सायंकाळी दूरध्वनीवरून नागपुरातील संबंधित यंत्रणेला ठोस कारवाईचे आदेश दिले. यानंतर यंत्रणा सज्ज झाली. अन्न व नागरी पुरवठा विभाग तसेच वजन व मापे विभागाचे संयुक्त पथक कामाला लागले. भाववाढ करणाèया व्यापाèयांची माहिती घेण्यात आली मात्र, रात्री उशिरापर्यंत कारवाई करण्यात प्रशासनाला यश आले नाही. अत्यावश्यक वस्तूंचा साठा व भाववाढ करणाèयांवर कारवाई सुरू असून पथकाद्वारे तपासणी करण्यात येत आहे. दोषींना सात वर्षांपर्यंत शिक्षेसाठी सरकार प्रयत्न करेल.

Leave a Reply

Your email address will not be published.