महाराष्ट्र

राज्यात २४ तासांत ७७ नवे कोरोनाग्रस्त;रूग्ण संख्या तीनशेपार

 मुंबई (मवृसे) राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढतच आहे. मुंबईसह संपूर्ण राज्यात गेल्या २४ तासांत ७७ नव्या रुग्णांची नोंद झाली असून, एकूण आकडा ३०२वर पोहोचला आहे. एकट्या मुंबई आणि परिसरात ५९ रुग्ण सापडले आहेत. कोरोनाचा संसर्ग वाढत असून, मुंबईत गेल्या २४ तासांत ५९ रुग्णांची नोंद झाली आहे. तर राज्यात एकूण ७७ नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ३०२वर पोहोचला आहे. मात्र, आजसंध्याकाळपर्यंत कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ही २३० होती. मग अचानक ७२ नवे करोना रुग्ण आले कुठून, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दुसरीकडे ही आकडेवारी खरी आहे, असे सांगितले जातआहेत आणि त्यांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे, आहे. खासगी रुग्णालयांमधील दाखल रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले असे सूत्रांकडून सांगितले जात आहे.

कोरोनाचा वाढता धोका: मुंबईत घरोघरी जाऊन तपासणी मुंबईत करोनाचा फैलाव थांबविण्यासाठी युद्धपातळीवर काटेकोर पावले उचलण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले असून नगरसेवकांच्या सर्व २२७ प्रभागांमध्ये पालिकेची भरारी पथके आजपासूनच घराघरांमध्ये तपासणी सुरू करण्यात आली आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेने मुंबईमधील लोकसंख्या आहे. येथील दाट लोकवस्ती तसेच विषाणू प्रसार होण्याची अधि शक्यता लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेस घरोघरी जाऊन तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. महापालिकेच्या उपायुक्त तसेच वॉर्ड अधिकाèयांशी मुख्यमंत्र्यांनी सोमवारी सायंकाळी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेऊन चर्चा केली व महत्त्वपूर्ण सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आजपासून ही तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे.

प्रसंगी कठोर निर्णय घ्यावे लागतील

आपण लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून २४ तास जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, औषधांची दुकाने सुरू ठेवली मात्र याचा गैरफायदा घेऊन लोक फिरायला निघाल्यासारखे घरातून निघत असतील तर ही सोय बंद करण्याचा कठोर निर्णय प्रसंगी घ्यावा लागेल, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published.