विदर्भ

नागपूरमध्ये आणखी ९ जणांना कोरोना

नागपूर (मवृसे) करोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा तांडव सुरू असलेल्या नागपुरातील सतरंजीपुरासाठी आजचा सुट्टीचा दिवस काळा रविवार ठरला. दाट लोकवस्ती असलेल्या या भागात आणखी नऊ जणांना करोनाची बाधा झाल्याचे आज स्पष्ट झाले. त्यामुळे आता नागपुरातील करोना बाधितांच्या संख्येने ६३ वरून थेट ७२ वर उसळी घेतली आहे. नागपूरसाठी सर्वांत चिंताजनक बाब म्हणजे, करोनाची लागण झालेल्या एकूण ७२ रुग्णांपैकी जवळजवळ ४० जण हे उपचारादरम्यान मेयोत दगावलेल्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या सहवासात आल्याने बाधित झाले आहेत. एकाच व्यक्तीमुळे इतक्या मोठ्या संख्यने करोनाची लागण होण्याचा हा बहुधा देशातील उच्चांकी आकडा आहे. करोनाच्या चाचणीत रविवारी पॉझिटिव्ह आलेले बहुतांशजण हे सतरंजीपूरा, मोमिनपूरा, शांतीनगर आणि कुंदनलाल गुप्त नगरातील रहिवासी आहेत. यातील काही जण बाधित रुग्णाचे नातेवाईक, शेजारी आहेत. हा रुग्ण आजारपणामुळे घरातच असताना हे नातेवाईक त्याला भेटण्यासाठी घरी गेले असता त्याच्या सहवासात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published.