चंद्रपुर

लॉकडाऊनमध्ये कोणतीही शिथिलता नाही

चंद्रपूर (का.प्र.) कोरोना विषाणू विरुद्ध सुरू असलेल्या लढा पुढील ३ मे पर्यंत कायम ठेवायचा असून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये लॉक डाऊन मध्ये कोणतीही शिथीलता नाही. ३ मे पर्यंत कोणीही घराबाहेर पडणार नाही.याची खबरदारी घ्यावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिले आहे. लॉकडाऊन संदर्भात कोणत्याही अफवांना बळी पडू नये. राज्य शासनाच्या निर्देशाप्रमाणे जिल्ह्यांमध्ये कार्यवाही करण्यात येणार आहे. लॉकडाऊन शिथील करण्याबाबत व त्यामध्ये काही विशिष्ट सूट देण्याबाबत कोणतेही आदेश नाहीत. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच लॉकडाऊन कायम राहील.

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सध्या एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही. मात्र कोरोना विषाणूच्या उद्रेकाला वेळलागत नाही. त्यामुळे खबरदारी म्हणून ३ मेपर्यंत काटेकोरपणे लॉकडाऊन पाळण्यात यावा,असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले आहेत. पोलीस प्रशासनाने उद्यापासून कारवाई कठोर करण्याचा निर्णय घेतला असून विनाकारण रस्त्यावर फिरणाèयांवर सक्त कारवाई करण्यात येईल. जीवनावश्यक वस्तूंची सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत ठेवलेली वेळ तशीच राहील. अन्य कोणताही बदल उद्यापासून होणार नाही. त्यामुळे नागरिकांनी ३ मेपर्यंत जिल्हा प्रशासनाच्या स्पष्ट निर्देशाचीवाट बघावी, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

तीन महिने भाडे वसुली नाही

राज्यात भाड्याच्या घरामध्ये राहणाèया नागरिकांकडून कोरोना विषाणू संघर्षाच्या काळामध्ये ३ महिन्यांचा किराया घेऊ नये, असे राज्याच्या गृहनिर्माण विभागाने स्पष्ट केले आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील घरमालकांनी देखील किरायादारांकडून सक्तीने घरभाडे वसुली करू नये व त्यांना घरातून काढू नये असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनारयांनी दिले आहे.जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भाडेकरू आहेत. यापैकी अनेकांचे रोजगार सध्या सुरू नाहीत. त्यामुळे घर मालकांनी घर भाड्यासाठी आग्रही राहू नये. परिस्थिती नसेल तर पुढील ३ महिने घर भाडयाची मागणी करू नये. या काळात भाडे न दिल्यास किंवा भाडे थकल्यामुळे कोणतेही भाडेकरूंना भाड्याच्या घरातून निष्कासित करण्यात येऊ नये, अशा सूचना गृहनिर्माण विभागाचे अप्पर मुख्य सचिव संजय कुमार यांनी दिले आहेत. या प्रमाणे जिल्ह्यामध्ये देखील सक्तीने भाडे वसुली करू नये असे त्यांनी स्पष्ट केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published.