चंद्रपुर जिल्हा

क्रिकेट खेळणाèया इंजिनिअरकडून पोलिसाला मारहाण

गडचांदूर (ता.प्र.)संपूर्ण शहरात संचारबंदी लागू असतांना गडचांदूर येथे सरण सॉ मिल समोरील ग्राऊंडवर क्रिकेट खेळणाèया युवकांना पोलिसांनी हटकले असता क्रिकेट खेळणाèया इंजिनियर व त्याच्या परिवाराने पोलिसावर बॅट व स्टंपने हमला केला. त्यामध्ये एक पोलीस कान्स्टेबल गंभीर जखमी झालाअसून त्याला चंद्रपूर येथे उपचारार्थ दाखल केले आहे.

आज दु. १२ वा. पोलीस कान्स्टेबल तिरूपती माने व रोहीत चिडगिरे पोलीस गस्त करीत असतांना सरण सॉ मिल समोरील ग्राऊंडवर काही युवक क्रिकेट खेळत होते. त्यांना पोलिसांनी खेळण्यास मनाई केली असता क्रिकेट खेळणाèया इंजिनिअर अविनाश चव्हाणने वाद करूनपोलिसांना शिविगाळ केली. तिरूपती माने याचे डोक्यावर बॅटने हमला केला. त्यात माने याचे डोके फुटून गंभीर जखमी झाले. रोहीत चिडगिरे याच्यावर स्टंपने हमला केला. त्यांना किरकोळ मार लागला आहे. जखमी तिरूपती माने यांना प्रथम ग्रामीण रूग्णालय गडचांदूर येथे उपचारार्थ दाखल केले. त्यानंतचंद्रपूर येथे दाखल केले आहे.

रोहीत चिडगिरे याला सुध्दा चंद्रपूरला हलविले आहे. गडचांदूर पोलिसांनी मारहाण करणारे अभियंता अविनाश चव्हाण व त्यांच्या इतर सहकाèयांना अटक केली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक गोपाल भारती तपास करीत आहे. आरोपी अविनाश चव्हाम, यशोदा चव्हाण, सतना चव्हाण, नवनाथ जाधव, भाग्यश्री जाधव या आरोपींना अटक केली असून अन्य आरोपींचा शोध घेत आहेत. तपास सुरू असून अद्याप पावेतो गुन्हा दाखल झाला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.