दिनांक ०६ मे २०२० रोजी रात्री दरम्यान माणिकगड गडचांदूर जिल्हा चंद्रपूर येथे नांदेड येथून आलेल्या तीन नागरिकांना संशयावरून जिल्हा प्रशासन व पोलिसाचे मदतीने ताब्यात घेतले होते. पोलीस व कोव्हीड १९ नियंत्रण कक्ष प्रशासनाच्या वतीने नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालय व पोलिसांसोबत संपर्क केला असता चंद्रपूर येथील ताब्यात घेतलेले तीन इसमांचे नावे हि नांदेड येथून पसार झालेल्या इसमांसोबत मिळ्तेजुळते नसल्याची माहिती मिळाली. तरीही पुढील खबरदारी म्हणून नांदेड येथील पथक हे अँब्युलन्ससह चंद्रपूर येथे येवून माणिकगड येथून ताब्यात घेतलेल्या नांदेड येथील तिन्ही नागरिकांना घेऊन पुढील तपासणी व पडताळणी साठी नांदेड येथे रवाना झाले.
Related Articles
चंद्रपूर जिल्ह्यात मागील 24 तासात 63 पॉझिटिव्ह
* गत 24 तासात 27 कोरोनामुक्त * आतापर्यंत 23,285 जणांची कोरोनावर मात * ॲक्टीव पॉझिटिव्ह 699 चंद्रपूर, दि. 10 मार्च : जिल्ह्यात मागील 24 तासात 27 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 63 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली आहे.जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 24 हजार 385 वर पोहोचली आहे. तसेच […]
राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत बकुळ धवने ठरली सर्वोत्कृष्ट रौप्यपदकाची मानकरी
राज्य नाट्य स्पर्धेतील सहावे रौप्यपदक सांस्कृतिक कार्य संचालनालया द्वारे आयोजित ६१ व्या हौशी अंतिम मराठी नाट्य स्पर्धेचा निकाल आज जाहीर झाला. वृंदावन या इरफान मुजावर लिखित नाटकातील आरिश या भूमिकेसाठी कु बकुळ धवने हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून रौप्यपदक जाहीर झाले. खडतर प्रवास अनुभवलेल्या वृंदावन ने राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत प्रथम क्रमांकासह ७, कामगार राज्य […]
चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे ‘अर्थ आठवडा’ साजरा
चंद्रपूर : पृथ्वीचे संवर्धन करण्यासाठी स्थानीक पातळीवर पर्यावरण संवर्धनाच्या विविध उपाययोजना करण्याच्या शासनाच्या आदेशानुसार चंद्रपूर महानगरपालिकेने नुकताच ‘अर्थ आठवडा’ साजरा केला.या आठवड्यात पंचमहाभूते – भूमी (जमीन),जल (पाणी), वायू (हवा),अग्नी (ऊर्जा),आकाश (संवर्धन) या सर्व घटकांचे संवर्धन व महत्व सांगणारे विविध कार्यक्रम घेण्यात आले. मागील काही वर्षात आपण वातावरणातील गंभीर बदल अनुभवत आहोत.वैश्विक पातळीवर या बदलांना […]



