
भद्रावती :वरोऱ्यावरून चंद्रपूरला जात असलेल्या दुचाकीची रस्त्याच्या कडेला असलेल्या पोलीस ट्राफिक बॅरिकेटला जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकी वरील दोन युवकांचा मृत्यू झाला. सदर घटना दिनांक 14 रोज शुक्रवारला भद्रावती शहराजवळील मानोरा फाट्याजवळ सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास घडली अंकुश सुनील भडगरे वय 23 वर्षे असे एका मृतकाचे नाव तर दुसऱ्याचे नाव हर्षल पाचभाई वय २३ वर्ष असे आहे . हे दोन्ही युवक वरोरा शहरातील रहिवासी होते. मृताक दोन्ही युवक हे आपल्या रेसर दुचाकीने चंद्रपूरला जात होते दरम्यान मानोरा फाट्याजवळ असताना चालकाचे नियंत्रण गेल्याने दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या बॅरिकेटला जोरदार आढळली यात या दोन युवकांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. भद्रावती पोलीस या अपघाताबाबत अधिक तपास करीत आहे.




