चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

देश गुलामगिरीच्या वाटेवर लोकशाहीची नितीमूल्ये टिकविण्यासाठी पेटून उठण्याची गरज – माजी मंत्री वडेट्टीवार

संविधानातील लोकशाहीची नीतिमूल्य जर टिकवायची असेल तर बहुजन नायक महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित होऊन पेटून उठा अन्यथा देश खड्ड्यात लोटला जाईल असे सुचक विधान करीत आपल्या परखड शैलीतून राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते आ. विजय वडेट्टीवार यांनी नागरिकांना संबोधित केले. ते क्रांतीभूमी चिमूर येथे आयोजित क्रांतीसुर्य महात्मा फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने आयोजित कार्यक्रमास उद्घाटक म्हणून बोलत होते.काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी एकजुटीने संघर्षाची भूमिका ठेवून क्रांती भूमीत विजय पताका फडकवा असे आवाहन करीत देशातील अराजेकतेच्या राजकारणालाही समर्थपणे तोंड देवून मनुवादी विचारांचे दहन करा असे परखड मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. रसिद्ध नाट्य कलावंत तथा गायक अनिरुद्ध वनकर यांचा प्रबोधनात्मक ” मी वादळ वारा’ या बहारदार भीम गीतांचा कार्यक्रम पार पडला.चिमूर येथील नेहरू विद्यालयाच्या पटांगणात आयोजित कार्यक्रमात माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते, आ. विजय वडेट्टीवार तर प्रमुख अतिथी म्हणून माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी, चंद्रपूर काँग्रेस (ग्रामीण) जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, ओबीसी विभागाचे जेसाभाई मोटवानी, अनुसूचित जाती सेलचे प्रफुल खापर्डे, चिमूर विधानसभा क्षेत्र काँग्रेसचे युवा नेते, दिवाकर निकुरे,अनिरुद्ध वनकर, सिंदेवाही काँग्रेस तालुका अध्यक्ष रमाकांत लोधे तसेच मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *