चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

मान्सून पूर्व महानगपालिकेतर्फे स्वच्छता मोहीम राबविण्यात यावी – डॉ.मंगेश गुलवाडे

भारतीय जनता पार्टी महानगर चंद्रपूर तर्फे मनपा आयुक्तांना निवेदन सादर
—————————————
महाराष्ट्र विधीमंडळ लोकलेखा समिती प्रमुख आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात भारतीय जनता पार्टी महानगर चंद्रपूर तर्फे चंद्रपूर शहर महानगरपालिका आयुक्त राजेश मोहिते यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले यावेळी भारतीय जनता पार्टी महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांनी येणाऱ्या काळात मान्सून सत्र सुरू होणार असून चंद्रपूर शहरातील विविध भागात कार्यरत असलेल्या नाल्यांच्या सफाई संदर्भात व डंपिंग यार्ड येथील स्वच्छता कर्मचारी यांच्या वेतना संदर्भात चर्चा केली व महानगपालिकेतर्फे वरील उपाययोजना त्वरित करण्यात याव्या अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून केली सदर निवेदन सादर करतांना जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे, माजी महापौर राखीताई कंचर्लावार,माजी स्थायी समिती सभापती संदीप आवारी,भाजयुमो अध्यक्ष विशाल निंबाळकर,दत्तप्रसन्न महादाणी, मंडळ अध्यक्ष विठ्ठल डुकरे, रवी लोणकर, दिनकर सोमलकर, सचिव रामकुमार आकेपेल्लीवार, राकेश बोमनवार, राजेंद्र खांडेकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published.