चंद्रपूर (का. प्र): शहरातील बाबुपेठ भागातील बहुतांश नागरिक सकाळी फिरण्याकरिता जुनोना रोड वर जातं असतात,जिल्ह्यात प्रदूषणाचे प्रमाण वाढत असल्याने नागरिकांना ताजी व शुद्ध हवा सकाळच्या सुमारास मिळते त्यासाठी नागरिक आपल्या सोयीनुसार सकाळी मॉर्निंग वॉक करायला जातात. परंतु हि मॉर्निंग वॉक कधीकधी जीवावर बेतले, अशीच एक घटना ११ जूनच्या सकाळी जुनोना रोड वर घडली. सकाळच्या सुमारास असंख्य नागरिक जुनोना रोडवर फिरत असताना अनियंत्रित हायवे ट्रक ने दोघांना धडक दिली यामध्ये ६० वर्षीय शेंडे नामक वृद्ध हा ठार झाला व अन्य १ जण गंभीर जखमी झाले. मृतक शेंडे हे बाबुपेठ येथील निवासी होते नेहमीप्रमाणे ते मॉर्निंग वॉकला गेले पण परिवारातील सदस्यांना काय माहित ते घरी अश्या अवस्थेत परतणार. सकाळच्या सुमारास या मार्गावर जडवाहनांची वाहतूक सुरु असते.
Related Articles
वादळी वाऱ्यामुळे नागरिकांच्या झालेल्या नुकसानाचे तात्काळ पंचनामे करा-पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे जिल्हाधिकारी यांना निर्देश
चंद्रपुर : जिल्ह्यात वादळी वाऱ्यांमुळे नागरिकांच्या घरांचे तसेच मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या वादळी वाऱ्यांमुळे झालेल्या नुकसानीचे प्रत्यक्ष मोक्यावर पंचनामे करून तात्काळ आपद्ग्रस्तांना मदत करण्याचे आदेश वने व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहेत. या वादळी वाऱ्यांमुळे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी शेतकरी, नागरिक यांच्या पिकांचे व घरांचे […]
चंद्रपूर जिल्ह्यात 71 नव्याने पॉझिटिव्ह ; तर दोन बाधितांचा मृत्यू
*जिल्ह्यात मागील 24 तासात 119 कोरोनामुक्त *आतापर्यंत 15,252 बाधित झाले बरे *उपचार घेत असलेले बाधित 2,191 चंद्रपूर, दि. 16 नोव्हेंबर: जिल्ह्यात गत 24 तासात 119 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला असून 71 जण नव्याने पॉझिटिव्ह आले आहेत.आज मृत झालेल्या बाधितामध्ये कटवाल, ता. भद्रावती येथील […]
लग्नाचे व-हाड घेऊन जाणारे क्रूझर वाहन पलटल्याने दोघांचा मृत्यू
◾नऊ जण जखमी चंद्रपूर : चिमूर तालुक्यातील भिसी येथून आंबोली या गावी लग्नाचे व-हाड घेऊन जाणारे क्रूझर वाहन रस्ताच्याकडेला तीनदा पलटी मारत उलटल्याने एका वृध्देसह दोन व-हाड्यांचा जागीच मृत्यू झाला. तर नऊ जण जखमी झाले आहेत. ही घटना काल रविवारी (23 मे) लादुपारी साडेतीनच्या सुमारास भिसी – आंबोली मार्गावर पुयारदंड गावाजवळ घडली.चिमूर तालुक्यातील भिसी येथून […]



