चंद्रपूर (का. प्र): शहरातील बाबुपेठ भागातील बहुतांश नागरिक सकाळी फिरण्याकरिता जुनोना रोड वर जातं असतात,जिल्ह्यात प्रदूषणाचे प्रमाण वाढत असल्याने नागरिकांना ताजी व शुद्ध हवा सकाळच्या सुमारास मिळते त्यासाठी नागरिक आपल्या सोयीनुसार सकाळी मॉर्निंग वॉक करायला जातात. परंतु हि मॉर्निंग वॉक कधीकधी जीवावर बेतले, अशीच एक घटना ११ जूनच्या सकाळी जुनोना रोड वर घडली. सकाळच्या सुमारास असंख्य नागरिक जुनोना रोडवर फिरत असताना अनियंत्रित हायवे ट्रक ने दोघांना धडक दिली यामध्ये ६० वर्षीय शेंडे नामक वृद्ध हा ठार झाला व अन्य १ जण गंभीर जखमी झाले. मृतक शेंडे हे बाबुपेठ येथील निवासी होते नेहमीप्रमाणे ते मॉर्निंग वॉकला गेले पण परिवारातील सदस्यांना काय माहित ते घरी अश्या अवस्थेत परतणार. सकाळच्या सुमारास या मार्गावर जडवाहनांची वाहतूक सुरु असते.
Related Articles
स्वातंत्र्य दिनानिमित्त अभाविप च्या वतीने चंद्रपूर शहरात तिरंगा यात्रा
चंद्रपूर:- जगातील सर्वात मोठी विद्यार्थी संघटना अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शाखा चंद्रपूर च्या वतीने स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट २०२३ रोजी म्हणजेच स्वातंत्र्याचे अमृत महोत्सव समाप्ती वर्ष निमित्त चंद्रपूर येथे सर्व विद्यार्थी, युवक, नागरीक यांच्या मनामध्ये देशभक्ती चे वातावरण निर्माण करण्याकरीता “५०० फुट अखंड तिरंगा यात्रा” सकाळी ९:३० ते दुपारी १२:३० या वेळेत काढण्यात येणार आहे. […]
वाघाच्या हल्ल्यात तेंदू पत्ता तोडणाऱ्या व्यक्ती ठार
नागभिड तहसील अंतर्गत येणाऱ्या नवेगाव हंडेस्वरी येथील आडकुजी मारोती गेडाम वय ६० वर्ष हा सकाळी ७ वाजता तेंडू पत्ता तोड न्याकरिता शिवारातील जंगलात गेला असता दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघ दबा धरून बसला तेव्हा हमला करून ठार केले.असे शेजारी तेण्डू पाने तोडणाऱ्याच्या लक्षात येताच गावात माहिती देण्यात आली. लगेच वन विभाग नागभिड माहिती देण्यात आली. […]
स्पर्धा परीक्षा तयारीसाठी नियोजन गरजेचे : रुपेश राऊत
स्पर्धा परीक्षा विषयी वेबिनारद्वारे मार्गदर्शन चंद्रपूर(का. प्र): दि. 17 जुलै: स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी उत्तम नियोजन असेल तर स्पर्धा परीक्षेत नक्कीच प्राविण्य प्राप्त होते. असे प्रतिपादन सहाय्यक नियोजन अधिकारी रूपेश राऊत यांनी केले. 16 जुलै रोजी स्पर्धा परीक्षा वेबीनारद्वारे युवक-युवतींना मार्गदर्शनात ते बोलत होते. जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन […]


