घुग्घुस(प्र.ति ) : घुग्घुस येथे सराफा दुकानात अज्ञातांनी चोरी केल्याची घटना 6 फेब्रुवारीला उघडकीस आली. बँक ऑफ इंडिया चौकातील श्री बालाजी ज्वेलरी दुकानांत चोरी दररोज प्रमाणे सतीश रंगुवार हे दुकान बंद करून घरी गेले मात्र अंधाराचा फायदा घेत मध्यरात्री च्या सुमारास 3 अज्ञात आरोपींनी शटर लॉक तोडत आत प्रवेश केला व चांदीचे आभूषण, अंगुठी, प्लेट यावर हात साफ केला, दुकानातील मुख्य तिजोरीला तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र आरोपींना ते जमलेला नाही त्यामुळे चांदीच्या वस्तू घेत ते पसार झाले.बँक ऑफ इंडिया चौकात अनेक बँकांचे एटीएम सेंटर आहे त्या सीसीटीव्ही मध्ये ते 3 आरोपी कैद झाले आहे, घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक मेघा गोखरे व पोलीस उपनिरीक्षक गौरीशंकर आमटे हे आपल्या ताफ्यासह पोहचले असून घटनेची चौकशी करीत आहे.
Related Articles
संगणक परिचालकांच्या मानधन वाढीबाबत सकारात्मक निर्णय घेणार – सुधीरभाऊ मुनगंटीवार
जिवती : राज्यात जवळपास २७००० संगणक परिचालक मागील ११ वर्षांपासून ग्राम पंचायत येथे सर्व ऑनलाईन तथा ऑफलाईन कामे तसेच नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवा जबाबदारीने पूर्ण करीत आहेत. परंतु ११ वर्षांपासून महागाई वाढत चालली परंतु संगणक परीचालकांच्या मानधनात मात्र वाढ झालीच नाही. संगणक परिचालक यांची पदनिश्चिती करून कायमस्वरूपी करण्यात यावे व त्यांच्या मानधनात वाढ करावी अशा […]
अपघातात ठार झालेल्या मित्राच्या घरी जेवण आटोपून निघाला आणि स्वतः अपघातात बळी पडला
गडचांदूर – अपघातात ठार झालेल्या मित्राच्या घरी तिसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमाला मित्र घरून निघाला व कार्यक्रम आटोपून घरी परत येत असताना तो स्वतः भयावह अपघातात ठार झाला. ही हृदयद्रावक घटना 19 मे च्या सायंकाळी 8 वाजता लोणी फाट्याजवळ घडली. मृत युवकाचे नाव 23 वर्षीय मंगेश चंद्रभान मोहूर्ले असे आहे. Two Wheeler accident मित्राच्या घरी जेवणाचा कार्यक्रम […]
प्रयत्नवादी बनून यशाचे शिखर गाठा – आ. किशोर जोरगेवार
यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार प्रत्येक गुणवंत विद्यार्थी समाजाच्या कामात आला पाहिजे. त्याने स्व:ताचे आणि पर्यायाने जिल्ह्याचे नाव देशात लौकिक करावे. शिक्षणातून पिढीचे कल्याण होते. आजच युग स्पर्धेचं असुन यात टिकुन राहयच असेल तर प्रयत्नात सातत्य ठेवा. नशिबाला किंवा परिस्थितीला दोष न देता प्रयत्नवादी बनुन यशाचे शिखर गाठा असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार […]



