घुग्घुस(प्र.ति ) : घुग्घुस येथे सराफा दुकानात अज्ञातांनी चोरी केल्याची घटना 6 फेब्रुवारीला उघडकीस आली. बँक ऑफ इंडिया चौकातील श्री बालाजी ज्वेलरी दुकानांत चोरी दररोज प्रमाणे सतीश रंगुवार हे दुकान बंद करून घरी गेले मात्र अंधाराचा फायदा घेत मध्यरात्री च्या सुमारास 3 अज्ञात आरोपींनी शटर लॉक तोडत आत प्रवेश केला व चांदीचे आभूषण, अंगुठी, प्लेट यावर हात साफ केला, दुकानातील मुख्य तिजोरीला तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र आरोपींना ते जमलेला नाही त्यामुळे चांदीच्या वस्तू घेत ते पसार झाले.बँक ऑफ इंडिया चौकात अनेक बँकांचे एटीएम सेंटर आहे त्या सीसीटीव्ही मध्ये ते 3 आरोपी कैद झाले आहे, घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक मेघा गोखरे व पोलीस उपनिरीक्षक गौरीशंकर आमटे हे आपल्या ताफ्यासह पोहचले असून घटनेची चौकशी करीत आहे.
Related Articles
खांबाडा – गोंदेडा मार्गावर मजूर घेऊन जाणारा पीकअप उलटला.
चार मजूर गंभीर जखमी ,तर 16 किळकोळ जखमी सर्व जणांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. चिमुर नेरीवरून जवळ असलेल्या खांबाडा गोंदेडा मार्गावर शेती च्या कामासाठी केवाडा येथील मजुरांना घेऊन जाणारी पीक अप चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे पीक अप रस्त्याच्या बाजूला पलटली यात चार जणांना गंभीर दुखापत झाली असून सोळा जन किळकोळ जखमी झाले असून […]
योगामुळे असाध्य रोगांवर उपचार शक्य…
Ø रोजच्या दिनक्रमामध्ये योगाचा समावेश करण्याचे आावाहन Ø जिल्हा क्रीडा संकूलात जागतिक योग दिन चंद्रपूर, दि. 21 जून : कोरोनाच्या संकटाने नागरिकांना आरोग्याबाबत चांगलाच धडा शिकायला मिळाला आहे. आपली रोगप्रतिकार शक्ती कशी वाढेल, याकडे नागरिक गांभिर्याने लक्ष देत असून दैनंदिन योगासने करण्यावर नागरिकांचा भर आहे. कारण असाध्य रोगांवरही योगामुळे उपचार शक्य होत असल्याचे मत जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी व्यक्त केले. […]
चंद्रपूर वीज केंद्राला नॅशनल पॉवर प्लांट अवॉर्ड्स वर्ष २०२३ सर्वोत्तम कामगिरी संच चे पारितोषिक
चंद्रपूर : २९२० मेगावाट स्थापित क्षमता असलेल्या चंद्रपूर महाऔष्णिक विदयुत निर्मिती केंद्राचा वीज उत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीचा नावलौकिक आहे. नैसर्गिक संसाधनांचे (पाणी, कोळसा आणि तेल) संरक्षण आणि इष्टतम वापर करण्यात येतो.महाराष्ट्राला नियमित आणि स्वस्त दरात वीज पुरवठा करण्यात चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राचे मोठे योगदान आहे. “एनव्हायरो एक्सलन्स कौन्सिल” (CEE) ही एक स्वायत्त, राष्ट्रीय-स्तरीय संस्था असून […]



