घुग्घुस(प्र.ति ) : घुग्घुस येथे सराफा दुकानात अज्ञातांनी चोरी केल्याची घटना 6 फेब्रुवारीला उघडकीस आली. बँक ऑफ इंडिया चौकातील श्री बालाजी ज्वेलरी दुकानांत चोरी दररोज प्रमाणे सतीश रंगुवार हे दुकान बंद करून घरी गेले मात्र अंधाराचा फायदा घेत मध्यरात्री च्या सुमारास 3 अज्ञात आरोपींनी शटर लॉक तोडत आत प्रवेश केला व चांदीचे आभूषण, अंगुठी, प्लेट यावर हात साफ केला, दुकानातील मुख्य तिजोरीला तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र आरोपींना ते जमलेला नाही त्यामुळे चांदीच्या वस्तू घेत ते पसार झाले.बँक ऑफ इंडिया चौकात अनेक बँकांचे एटीएम सेंटर आहे त्या सीसीटीव्ही मध्ये ते 3 आरोपी कैद झाले आहे, घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक मेघा गोखरे व पोलीस उपनिरीक्षक गौरीशंकर आमटे हे आपल्या ताफ्यासह पोहचले असून घटनेची चौकशी करीत आहे.
Related Articles
आजचे कोरोना अपडेट
गत 24 तासात 2151 कोरोनामुक्त, 1180 पॉझिटिव्ह तर 22 मृत्यू आतापर्यंत 56,599 जणांची कोरोनावर मात ॲक्टीव पॉझिटिव्ह 14,027 चंद्रपूर, दि. 9 मे : जिल्ह्यात मागील 24 तासात 2151 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 1180 कोरोना बाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 22 बाधीतांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण […]
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा – आ किशोर जोरगेवार
काल मंगळवारी चंद्रपूरात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक घरांची पडझड झाली आहे. या नुकसनीचे पंचनामे करण्याचे आदेश तात्काळ देण्यात यावे, मदत केंद्र सुरु करण्यात यावे, येथील नाल्यांच्या खोलीकरण, रुंदीकरणासाठी निधीची घोषणा करण्यात यावी अशी मागणी आज पावसाळी अधिवेशनात बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे. मंगळवारी चंद्रपूर शहरात झालेल्या पावसामुळे बाबूपेठ, आंबेडकर नगर, सिस्टर कॉलनी, जलनगर, रय्यतवारी […]
वाघाच्या हल्ल्यात युवकाचा नाहक बळी…
वनाधिकारी व पोलीस अधिकाऱ्याविरूध्द पोलीसात तक्रार शेतात गुरे चारण्यासाठी गेलेल्या शेतकरी युवकावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना आज दुपारी एक वाजताच्या दरम्यान तालुक्यातील पडझरी येथे घडली. प्रमोद झुंगाजी मोहुर्ले वय ३२ असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. तालुक्यातील भादुर्णी गट ग्राम पंचायत अंतर्गत येत असलेल्या पडझरी येथील युवा शेतकरी प्रमोद मोहुर्ले नेहमी […]



