
गडचांदूर – अपघातात ठार झालेल्या मित्राच्या घरी तिसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमाला मित्र घरून निघाला व कार्यक्रम आटोपून घरी परत येत असताना तो स्वतः भयावह अपघातात ठार झाला. ही हृदयद्रावक घटना 19 मे च्या सायंकाळी 8 वाजता लोणी फाट्याजवळ घडली. मृत युवकाचे नाव 23 वर्षीय मंगेश चंद्रभान मोहूर्ले असे आहे. Two Wheeler accident मित्राच्या घरी जेवणाचा कार्यक्रम आटोपून मंगेश आपले दुचाकी वाहन mh34 bs6764 ने मोबाईल घेण्यासाठी कोरपना येथे परत येत होता, लोणी फाट्याजवळ पोहचताच 8 वाजता समोरून येणाऱ्या दुचाकी क्रमांक mh34 y4811 च्या चालकाने निष्काळजीपनाणे वाहन चालवीत मंगेश च्या दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की यामध्ये मंगेश जागीच मरण पावला तर 22 वर्षीय योगेश कसारे हा गंभीर जखमी झाला. जखमीला ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले असून पुढील तपास कोरपना पोलीस करीत आहे.




