
चंद्रपूर : राष्ट्रवादी किसान सेल चे जिल्हा अध्यक्ष विदर्भ चंडिका चे जिल्हा प्रतिनिधी स्वर्गवासी सुरेश रामगुंडेययांचे दुर्धर आजाराने दी,16 मई रोजी निधन झाले होते,
दि,6 जून रोजी चंद्रपूर दौऱ्यावर आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे सर्व कार्यक्रम आटपून साय,6च्या दरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे निष्ठावंत किसान सेल चे जिल्हा अध्यक्ष सुरेशभाऊ रामगुंडे यांचा निधन झाल्याने त्यांचा परिवाराला दुःखाचा डोंगर कोसळल्याने त्यांचा परिवाराला त्यांचा घरी जाऊन सांत्वन भेट दिली, सुरेशभाऊ ला दोन मुली मेघा, तेजस्विनी, आणि पत्नी यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळल्याने त्यांना कोणत्याही प्रकारची मदद, समोरच्या भविष्यात येणारी कोणतेही अडचण आल्यास त्याचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले,या वेळी सुप्रियाताई नी मोठी मुलगी मेघा रामगुंडे यांना म्हणाल्या सुरेशभाऊ ची वारस तूच आहे सुरेशभाऊ चे कार्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मध्ये मोठे मोलाचे योगदान दिले,त्यांचे कार्य असेच समोर नेण्याचे सूचना दिली, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवती विदर्भ अध्यक्ष मेघा रामगुंडे यांनी सुप्रियाताई सुळे ने त्यांच्या घरी येऊन वडील सुरेश रामगुंडे यांचा निधनानंतर सांत्वना भेट देऊन श्रद्धांजली वाहिली म्हणूनआभार मानले,यावेळी सुप्रियाताई सोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार प्रकाश गजभिये, राजीव कक्कड,राजेंद्र वैद्य, बेबीताई उईके, नितीन भटारकर,वर्षा शामकुळे,हिराचंद बोरकुटे, संजय वैद्य राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .



