चंद्रपूर -हातरस येथील मुलीवर झालेल्या अत्याचाराविरुध्द चंद्रपूर शहर काँग्रेस कमिटीद्वारा गांधीचौकात सत्याग्रह आंदोलन करून निषेध नोंदविला.पहा हा व्हिडिओ,आपले विचार मांडताना अनुताई दहेगावकर.
चंद्रपूर (का.प्र.) चंद्रपूर शहरापासून काही अंतरावर असलेल्या रामनगर पोलीस स्टेशन हद्दीतील चेक निंबाळा गावात एका फार्म हाऊसवर सुगंधित तंबाखू असल्याची गोपनीय माहिती रामनगर पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी फार्म हाऊसवर धाड टाकली असता जवळपास ५० लाखांचा सुगंधित तंबाखूचा साठा आढळून आला. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून पुढील कारवाई सुरु आहे.
चंद्रपूर (ता.प्र):चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार पहाता चंद्रपूर जिल्ह्यात जनता कर्फ्यू २५ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर पर्यंत करण्यात आलेला आहे. पहा हा पालकमंत्र्यांच्या व्हिडीओ *मास्क न लावणाऱ्यास ५००/- रुपये दंड आकारण्यात येणार आहे.
चंद्रपूर (का.प्र.)चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही. मात्र देशासह राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण संख्या वाढत आहे.कोरोनाचा उद्रेक झाल्यास सर्व आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. मात्र कोणीही आपला आजार लपवून ठेवू नये. रुग्णाची तपासणी करण्याची संपूर्ण तयारी जिल्ह्यात आहे.त्यामुळे पुढील काळात घराच्या बाहेर निघावे लागणार नाही. असेआठवड्याभराचे नियोजन करा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी […]