अर्धा लिटरच्या पॅालीथिन पॉकेटचा साठा संपल्याने निर्णय दूध वितरक व ग्राहकांनी नोंद घेण्याचे आवाहन चंद्रपूर दि. 22 जुलै: शासकीय दूध योजना, चंद्रपूर येथील अर्धा लिटरच्या पॅालीथिन फिल्मचा साठा संपुष्टात आल्याने अर्धा लिटरच्या पॅालीफिल्मचा साठा उपलब्ध होईपर्यंत दिनांक 23 जुलै 2020 पासून एक लिटरच्या पॅालीफिल्म मधून अर्धा लिटर पाश्चराईज्ड व होमोनाईज्ड टोन्ड दुधाचा पुरवठा करण्यात येईल. अर्धा लिटर दुधाच्या पॉकिटाची किंमत 18 रु. तर एक लिटर दुधाच्या पॉकिटाची किंमत 36 रु. राहील. तरी सर्व संबंधित शासकीय दूध वितरकांनी व ग्राहकांनी याची नोंद घ्यावी व सहकार्य करावे, असे आवाहन दुग्धशाळा व्यवस्थापक शासकीय दूध योजना, चंद्रपुर यांनी केले आहे.
Related Articles
जिल्हा निहाय आढावा घेवून निवडणुकीचा कार्यक्रम तयार करा -सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला निर्देश
ज्या ठिकाणी फार पाऊस नसतो, त्या ठिकाणी निवडणूक घेण्यास काय हरकत – सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली :- महाराष्ट्रातील स्थानिक निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टाने आज राज्य निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. ज्या ठिकाणी फार पाऊस नसतो, त्या ठिकाणी निवडणुका घेण्यास काय हरकत आहे, असा प्रश्न करत जिल्हानिहाय आढावा घेऊन कार्यक्रम तयार करण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने निवडणूक […]
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रक्तदान व श्रमदान शिबीर
चंद्रपूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील विकृतीशास्त्र व नर्सिंग विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान व श्रमदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात रुग्णालयातील सर्व नर्सिंग स्टाफ, महाविद्यालयीन कर्मचारी व विद्यार्थ्यांनी रक्तदान केले. तसेच जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या माध्यमातून रक्तपेढी 28, दत्तनगर 30, गडचांदूर 44 व चिंतलधाबा 30 […]
चंद्रपुरात 100 फूट तर घुग्घुस शहरात 75 फूट उंचीचा राष्ट्रध्वज फडकणार – आमदार किशोर जोरगेवार
चंद्रपूर –देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. हा अमृत महोत्सव जल्होशात साजरा करत असतांना स्वातंत्र्यासाठी बलीदान देणा-या स्वातंत्र सैनिकांनाही आपण स्मरण केले पाहिजे. येत्या १५ ऑगस्टला प्रत्येक घरी तिरंगा लागला पाहिजे असे आवाहण करत आपणही चंद्रपूरात १०० फुट उंचीचा राष्ट्रध्वज लागावा यासाठी नियोजन केले असुन त्यासाठी जिल्हाधिकारी यांना २५ लक्ष रुपयांचा निधी दिला असुन […]



