अर्धा लिटरच्या पॅालीथिन पॉकेटचा साठा संपल्याने निर्णय दूध वितरक व ग्राहकांनी नोंद घेण्याचे आवाहन चंद्रपूर दि. 22 जुलै: शासकीय दूध योजना, चंद्रपूर येथील अर्धा लिटरच्या पॅालीथिन फिल्मचा साठा संपुष्टात आल्याने अर्धा लिटरच्या पॅालीफिल्मचा साठा उपलब्ध होईपर्यंत दिनांक 23 जुलै 2020 पासून एक लिटरच्या पॅालीफिल्म मधून अर्धा लिटर पाश्चराईज्ड व होमोनाईज्ड टोन्ड दुधाचा पुरवठा करण्यात येईल. अर्धा लिटर दुधाच्या पॉकिटाची किंमत 18 रु. तर एक लिटर दुधाच्या पॉकिटाची किंमत 36 रु. राहील. तरी सर्व संबंधित शासकीय दूध वितरकांनी व ग्राहकांनी याची नोंद घ्यावी व सहकार्य करावे, असे आवाहन दुग्धशाळा व्यवस्थापक शासकीय दूध योजना, चंद्रपुर यांनी केले आहे.
Related Articles
जिल्ह्यात आजपासून क्षयरोग व कुष्ठरोग संयुक्त शोध मोहीम , जिल्हाधिका-यांनी घेतला आढावा
चंद्रपूर, दि. 12 सप्टेंबर : जिल्ह्यात 13 ते 30 सप्टेंबर या कालावधीत कुष्ठरोग तसेच सक्रीय क्षयरुग्ण शोध मोहीम संयुक्तरित्या राबविण्यात येणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आरोग्य विभागाचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमचंद कन्नाके, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. संदीप गेडाम, जिल्हा क्षयरोग […]
घरी वडिलांचे प्रेत,मुलगा गेला परीक्षा द्यायला. बल्लारपुरातील हृदयदायक घटना
स्वतः च्या कृती तुन दिला मोठा संदेश बल्लारपूर शहरातील संतोषी माता वार्ड, कारवा रोड येथील रहिवासी रुपलाल लोखंडे वय 48 वर्ष यांचे काल 26 एप्रिल सायंकाळच्या सुमारास दीर्घ आजाराने मृत्यू झाले. ते गंगासागर नाईक आश्रम शाळा, आंबेधानोरा येथे शिक्षक म्हणून कार्यरीत होते. त्यांना दोन मुले, पत्नी आहेत. आज त्यांचा मुलाचं अनुरागचा 10 च्या सीबीएसई बोर्ड […]
आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार मिळविणाऱ्या मराठी सिनेमांना दुप्पट अनुदान देणार
सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा मुंबई : गेल्या काही वर्षात मराठी सिनेमांना आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर विविध विभागात पुरस्कार मिळत आहेत. या मराठी सिनेमांना राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत देण्यात येणारे प्रोत्साहन अनुदान दुप्पट करण्यात येईल, असे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. सहयाद्री अतिथीगृह येथे चित्रपट उद्योगातील चित्रपट / टिव्ही / ओटीटी […]



