अर्धा लिटरच्या पॅालीथिन पॉकेटचा साठा संपल्याने निर्णय दूध वितरक व ग्राहकांनी नोंद घेण्याचे आवाहन चंद्रपूर दि. 22 जुलै: शासकीय दूध योजना, चंद्रपूर येथील अर्धा लिटरच्या पॅालीथिन फिल्मचा साठा संपुष्टात आल्याने अर्धा लिटरच्या पॅालीफिल्मचा साठा उपलब्ध होईपर्यंत दिनांक 23 जुलै 2020 पासून एक लिटरच्या पॅालीफिल्म मधून अर्धा लिटर पाश्चराईज्ड व होमोनाईज्ड टोन्ड दुधाचा पुरवठा करण्यात येईल. अर्धा लिटर दुधाच्या पॉकिटाची किंमत 18 रु. तर एक लिटर दुधाच्या पॉकिटाची किंमत 36 रु. राहील. तरी सर्व संबंधित शासकीय दूध वितरकांनी व ग्राहकांनी याची नोंद घ्यावी व सहकार्य करावे, असे आवाहन दुग्धशाळा व्यवस्थापक शासकीय दूध योजना, चंद्रपुर यांनी केले आहे.
Related Articles
आजचे कोरोना अपडेट
चंद्रपूर, दि. 5 सप्टेंबर : गत 24 तासात जिल्ह्यात 4 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 7 जण नव्याने पॉझिटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात रविवारी एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही. आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या 7 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 3, चंद्रपूर तालुका 1, बल्लारपूर 2, भद्रावती 0, ब्रम्हपुरी 0, […]
कोंबड बाजारावर पोलिसांची धाड , पाच आरोपी अटकेत
मुल – दि. ०९/११/२०२२ रोजी पो स्टे मुल येथे पोउपनि पुरुषोत्तम राठोड, नापोअं चिमाजी देवकत्ते / २४९७, पोअं/श्रावण २६८६, पोअं शफीक, पोअं संजय / १५९१ चालक पोअं स्वप्नील/ १३९५ असे मिळून पो स्टे मुल परिसरात प्रोव्ही रेड, जुगार रेड पेट्रोलिंग करीत असताना मुल तालुक्यातील मौजा येरगाव येथे शेत शिवारात उमा नदीच्या काठावार काही इसम अवैधरित्या […]
अज्ञात वाहनांच्या धडकेत 34 वर्षीय वनरक्षकाचा मृत्यू
शेगाव – वनक्षेत्रात गस्त करून परत येत असताना 34 वर्षीय वनरक्षक सुरेश केंद्रे यांचा रविवारी रात्री 11.30 वाजता अज्ञात वाहनांच्या धडकेत मृत्यू झाला. सुरेश केंद्रे हे खडसंगी बफर वनपरिक्षेत्रातील बोथली वहाणगाव येथे कार्यरत होते. वनरक्षक सुरेश केंद्रे हे बोथली(वहानगाव) बिटात सायंकाळच्या सुमासरस वनक्षेत्रात गस्त करण्यासाठी गेले होते. दरम्यान कर्तव्यावरून घरी खडसंगी कडे परत येत असताना […]



