चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

कोंबड बाजारावर पोलिसांची धाड , पाच आरोपी अटकेत

मुल – दि. ०९/११/२०२२ रोजी पो स्टे मुल येथे पोउपनि पुरुषोत्तम राठोड, नापोअं चिमाजी देवकत्ते / २४९७, पोअं/श्रावण २६८६, पोअं शफीक, पोअं संजय / १५९१ चालक पोअं स्वप्नील/ १३९५ असे मिळून पो स्टे मुल परिसरात प्रोव्ही रेड, जुगार रेड पेट्रोलिंग करीत असताना  मुल तालुक्यातील मौजा येरगाव येथे शेत शिवारात उमा नदीच्या काठावार काही इसम अवैधरित्या कोंबडयाची झुंज लढवून पैशाची बाजी लावून हारजितचा जुगार खेळ खेळीत आहे अशा माहीती वरून सदर ठिकाणी दिनांक ०९/११/२०२२ चे दुपारी ०३:३० वा दरम्यान छापा मारला असता तेथे नामे १) दिलीप डोनूजी निकूरे वय ५२ वर्ष रा. चिमडा ता. मुल, जि. चंद्रपूर. २) पुनेश्वर कवडू नागोसे वय ५५ वर्ष रा. चितेगाव ता. मुल जि. चंद्रपूर ३) प्रमोद हरिशचंद्र गावतूरे वय ३८ वर्ष रा. हळदी ता. मुल जि. चंद्रपूर ४) सुधीर मधूकर मुनगंटीवार वय ३२ वर्ष रा. हळदी ता. मुल जि. चंद्रपूर ५) मारोती चरणदास पिंपळे वय २५ वर्ष रा. हळदी ता. मुल जि. चंद्रपूर ६) इश्वर पुरुषोत्तम कोठारे वय २६ वर्ष रा. हळदी ता. मुल जि. चंद्रपूर असे जुगार खेळताना मिळून आले असून त्यांच्या ताब्यातून ३ जखमी कोंबडे, नगदी २७००/- रू. ४ मोबाईल व ४ मोटार सायकल असा एकूण २,१५,४००/- रू चा माल जप्त करून आरोपी विरूदध गुन्हा नोंद करण्यात आला. सदर कारवाई उपविपोअ श्री मल्लीकार्जुन इंगळे सा. व पो नि श्री सतीशसिंह राजपूत सा. यांच्या मार्गदर्शनात पोउपनि पुरुषोत्तम राठोड, नापोअं चिमाजी देवकते पोअं श्रावण कुत्तरमारे, शफीक शेख, संजय जुगनाके, स्वप्नील खोब्रागडे यांनी केली आहे..

Leave a Reply

Your email address will not be published.