चंद्रपूर (का . प्र ) चंद्रपूर जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट आली असून आज दि. २६ मे रोजी राजुरा येथील भारत चौकात राहणारा शफिक शेख इमाम या २७ वर्षीय युवकाचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना घडली. स्थानिक भारत चौक येथील रहिवाशी शफिक शेख इमाम वय २७ या युवकाचा उष्माघाताने दूर्देवी मृत्यू झाला. गेल्या तीन दिवसापासून राजुरा भागात भीषण उन्हाचा तडाखा नागरिकांना बसत आहे. येथील तापमान ४५ डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त गेल्याची माहिती आहे. शफिक हा गरीब कुटुंबातील युवक येथील एका दुकानात काम करतो. हा युवक उन्हात फिरल्यानंतर त्याची प्रकृति बिघडली . त्याला दवाखान्यात नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. चंद्रपूर जिल्ह्यात तापमान प्रचंड वाढले असून ४६ ते ४७ डिग्री अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले आहे. काळ पासून नवतपा सुरु झाला आहे. तरी नागरिकांनी उन्हात कमीत-कमी निघावे. व उष्णेपासून स्वतः बचाव करावा
Related Articles
भीषण अपघात ; 2 ठार, 3 गंभीर जखमी
◾ब्रम्हपुरी-वडसा रोड वर विद्यानिकेतन जवळ भीषण अपघात घडला चंद्रपुर चंद्रपूर जिल्ह्याच्या पूर्व टोकावर असलेल्या ब्रम्हपुरी तालुक्यात आजची पहाट दुःखदायक स्वरूपात उदयास आली सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पहाटे 3 वाजताच्या दरम्यान ब्रम्हपुरी-वडसा रोड वर विद्यानिकेतन जवळ भीषण अपघात घडला असून या अपघातात 2 ठार तर 3 गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. या विषयीच्या अधिक माहितीनुसार ब्रम्हपुरी -वडसा […]
मुलीने केली जन्मदात्या आईची क्रूर हत्या
सिंदेवाही – सिंदेवाही तालुक्यातील मौजा नलेश्वर या गावी राहणाऱ्या श्रीमती तानाबाई महादेव सावसाकडे वय 65 वर्षे यांची दिनांक 3/ 10/ 2022 रोजी रात्री हत्या झालेली असून तिचे अंत्यविधी गावातील स्मशानभूमीत करण्यात आलेले होते. तानाबाई ची हत्या घरातीलच व्यक्तींनी केलेली असल्याची तक्रार मृत महिलेची मुलगी रंजना रामेश्वर सोनवणे हिने सिंदेवाही पोलीस स्टेशन येथे येऊन दिली. अशा […]
आवळगावकऱ्यांनी केली बाहेरच्यांना प्रवेश बंदी
आवळगाव (प्रति)पूर्वी व हल्ली खेडेगावात धाना वरती निसर्गाच्या कोपाने अळी पडल्यास गावातील गावकरी अळी बांधण्याचा कार्यक्रम हाती घेऊन अळीचा समूळ नायनाट करण्यासाठी रातभर जागरण भजन कीर्तन करुन गावा सभोवतालच्या सीमा बंद करून अळीबांधण्याचा कार्यक्रम करीत असत. हा परंपरेनुसार चालत आलेला समज होता. आता या विज्ञान युगात संसर्गजन्य रोग हा देवाचा नाही हे कोरोना या साथीच्या […]



