चंद्रपूर, दि. 4 डिसेंबर : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, चंद्रपूर यांना आर्थिक वर्ष 2020-21 करिता बीज भांडवल योजना, वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजना व गट कर्ज व्याज परतावा योजनेकरिता उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. बीज भांडवल योजनेकरिता भौतीक 45 प्रकरणे, आर्थिक रुपये 33.75 लाख निश्चित केले आहे. तसेच वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजनेकरिता भौतिक 50 प्रकरणे, आर्थिक रुपये 57 लाख व गट कर्ज व्याज परतावा योजनेकरिता भौतीक 12 प्रकरणे, आर्थिक रु. 70.25 लाख उद्दिष्ट निचित केले आहे.महामंडळाच्या विविध योजनांची माहिती www.msobcfdc.org या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. अधिक माहिती करिता शाखा व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य इतर मागावर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जलनगर, चंद्रपूर येथे किंवा दुरध्वनी क्रमांक 07172-262420 यावर संपर्क साधावा असे महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक संजय बावनकर यांनी कळविले आहे.
Related Articles
अज्ञान वाहनाच्या धडकेत बिबट ठार
बल्लारपुर – चंद्रपुर मार्गावरील मौजा भिवकुंड येथील निर्मल धाबा जवळील नाल्या जवळ दिनांक 20.11.2022 ला रात्री 9.00 वाजताच्या सुमारास अज्ञान वाहनाच्या धडकेत बिबट वन्यप्राणी मृत्य पावल्याबाबत श्री . नरेश भोवरे, वनपरिक्षेत्र अधिकारी, बल्हारशाह (प्रादे) यांना माहिती प्राप्त झाली. त्यानुसार वनपरिक्षेत्र अधिकारी, बल्हारशाह (प्रादे) हे अधिनस्त कर्मचारी यांचे सह घटना स्थळी दाखल झाले व मृत बिबटयाचा […]
मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाकडून रद्द होईल हे अपेक्षीत होते : डॉ. अशोक जिवतोडे, राष्ट्रीय समन्वयक, राष्ट्रीय ओबीसी महासंघ.
बहुप्रतिक्षीत मराठा आरक्षणाचा निकाल देत आज (दि.5 मे) ला मा. सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केले. केंद्र व राज्यात सत्ता असलेल्या मागील सरकारने गायकवाड समितीचा अहवाल मंजूर करुन घेतला व थातुरमातुर आरक्षण देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र मा. सुप्रीम कोर्टाने गायकवाड अहवालातून मराठा समाजाचे मागासलेपन सिध्द होत नाही व मराठा समाजाला 50% पेक्षा जास्त आरक्षण […]
चंद्रपूर जिल्ह्यातील आजचे कोरोना अपडेट्स
*जिल्ह्यात गेल्या २४ तासात ४३ जण कोरोना बाधित *तसेच आज जिल्ह्यात आज एकही जणाचा मृत्यू नाही *आज कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या-६६ *जिल्ह्यातील आतापर्यंतची एकूण बाधितांची संख्या-२२०२१ *आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या-२१०४४ *सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या-६२१ *आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या-३५६ (जिल्ह्यातील) बाहेरील (२७) *जिल्हा प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे. *सोशिअल डिस्टंसिंगचे पालन करून. मास्कचे […]



