
बल्लारपुर – चंद्रपुर मार्गावरील मौजा भिवकुंड येथील निर्मल धाबा जवळील नाल्या जवळ दिनांक 20.11.2022 ला रात्री 9.00 वाजताच्या सुमारास अज्ञान वाहनाच्या धडकेत बिबट वन्यप्राणी मृत्य पावल्याबाबत श्री . नरेश भोवरे, वनपरिक्षेत्र अधिकारी, बल्हारशाह (प्रादे) यांना माहिती प्राप्त झाली. त्यानुसार वनपरिक्षेत्र अधिकारी, बल्हारशाह (प्रादे) हे अधिनस्त कर्मचारी यांचे सह घटना स्थळी दाखल झाले व मृत बिबटयाचा शवाचा मौका पंचनामा करुन शवास ताब्यात घेतले . बिबट या वन्यप्राण्याच्या डोक्याला जबर मार लागुन मोठया प्रमाणात रक्त स्त्राव झाल्यामुळे सदर वन्यप्राणी मृत पावल्याबाबत प्रथम दर्शनी निदर्शणास आले. सदर बिबट ही मादी असुन तीचे वय अंदाजे 3 ते 4 वर्ष इतके आहे. बिबट वन्यप्राण्याचे शव डिप फ्रिजर मध्ये ठेवण्याकरीता वन्यजिव उपचार केन्द्र, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपुर येथे नेण्यात आले असुन उद्या सकाळी 11.00 वाजता बिबट वन्यप्राण्याचे शवविच्छेन वन्यजीव उपचार केन्द्र, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपुर येथे करण्यात येणार आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास श्रीमती श्वेता बोड्डु, उपवनसंरक्षक, मध्य चांदा वनविभाग, चंद्रपुर व श्री . श्रीकांत पवार, सहाय्यक वनसंरक्षण यांचे मार्गदर्शनात नरेश भोवरे, वनपरिक्षेत्र अधिकारी, बल्हारशाह (प्रादे) हे करीत आहे. – सदर ठिकाणी मोठया प्रमाणात वाहतुक कोंडी निर्माण होती त्यावेळी पोलीस स्टेशन, बल्हारपुर येथील पोलीस कर्मचारी यांनी मेहनत घेवुन वाहतुक सुरळीत पणे सुरु करुन वनविभागास मदत केली. यावेळी वनरक्षक कु.वर्षा पिपरे, श्री. एम. एम. बोकडे, श्री.टि.ओ. कामले व ए.एम. चहांदे हे सदरचे कार्यवाहीत सहभागी होते.




