चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

जिल्ह्यातील ७ नगर परिषद व भिसी नगर पंचायतीच्या प्रभाग रचनेच्या नकाशावर आक्षेप व हरकती १० मे ते १४ मे पर्यंत घेण्याचे निर्देश.

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर, वरोरा, चिमूर, मूल, राजुरा, घुगुस व नागभीड या नगरपरिषदांच्या व भिसी नगरपंचायतीच्या सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारुप प्रभाग रचनेच्या प्रस्तावास दि. 7 मार्च 2022 रोजी मान्यता दिलेली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशास अनुसरून राज्य निवडणूक आयोगाच्या दि. 10 मार्च 2022 रोजी सुरू असलेल्या टप्प्यांपासून निवडणुकांची कार्यवाही त्वरित सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.
त्याअनुषंगाने आयोगाने दि. 6 मे 2022 रोजी सुधारित प्रारूप प्रभाग रचना कार्यक्रम-2022 जाहीर केल्यानुसार उपरोक्त नगरपरिषदा, नगरपंचायतीमधील प्रारूप प्रभाग रचना व प्रभागदर्शक नकाशावर हरकती व सूचना मंगळवार दि. 10 मे ते शनिवार दि. 14 मे 2022 पर्यंत संबंधित नगरपरिषद, नगरपंचायत कार्यालयात मागविण्यात येत आहे.
दि. 10 मार्च 2022 पासून प्रारूप प्रभाग रचनेवर प्राप्त झालेल्या आक्षेप व हरकतीसह सुधारित कार्यक्रमानुसार नव्याने प्राप्त होणाऱ्या आक्षेप व हरकतीवर सुनावणी जिल्हाधिकारी कार्यालयाद्वारे सोमवार दि. 23 मे 2022 पर्यंत घेण्यात येईल. असे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *