चंद्रपूर, दि. 4 डिसेंबर : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, चंद्रपूर यांना आर्थिक वर्ष 2020-21 करिता बीज भांडवल योजना, वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजना व गट कर्ज व्याज परतावा योजनेकरिता उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. बीज भांडवल योजनेकरिता भौतीक 45 प्रकरणे, आर्थिक रुपये 33.75 लाख निश्चित केले आहे. तसेच वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजनेकरिता भौतिक 50 प्रकरणे, आर्थिक रुपये 57 लाख व गट कर्ज व्याज परतावा योजनेकरिता भौतीक 12 प्रकरणे, आर्थिक रु. 70.25 लाख उद्दिष्ट निचित केले आहे.महामंडळाच्या विविध योजनांची माहिती www.msobcfdc.org या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. अधिक माहिती करिता शाखा व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य इतर मागावर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जलनगर, चंद्रपूर येथे किंवा दुरध्वनी क्रमांक 07172-262420 यावर संपर्क साधावा असे महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक संजय बावनकर यांनी कळविले आहे.
Related Articles
काझीपेट पुणे एक्सप्रेस रोज चालविण्याची मागणी
सुधीर मुनगंटीवार यांचे रेल्वेमंत्र्यांना पत्र चंद्रपूर : काझीपेट-पुणे सुपरफास्ट एक्सप्रेस ही सध्या साप्ताहिक तत्वावर धावणारी गाडी रोज चालवावी, अशी मागणी चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहून केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना पुणे येथे जाण्याकरिता केवळ काझीपेट-पुणे सुपरफास्ट एक्सप्रेस ही एकच थेट गाडी सध्या उपलब्ध आहे. ही गाडी आठवड्यात केवळ […]
आ.किशोरभाऊ जोरगेवार यांच्या प्रयत्नातून 2 ईसीजी मशीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे सुपूर्त
दिलेला शब्द पाळत आमदार किशोर जोरगेवार यांनी शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाला दोन इसिजी मशीन उपलब्ध करुन दिल्या असुन यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी सदर दोन मशीन शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाकडे सुपुर्त केल्या आहे. यावेळी शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाचे वैद्यकीय निवासी अधिकारी निवृत्ती जिवने, यंग चांदा ब्रिगेडचे महानगर जिल्हाध्यक्ष पंकज गुप्ता, अल्पसंख्याक विभागाचे युथ शहराध्यक्ष राशेद हुसेन, परिचालीका प्रमुख विद्या […]
दुर्गापूर येथील दुर्घटनेतील मृतकांच्या कुटूंबियांना मुख्यमंत्री निधीतुन 6 लाख रु.चे अर्थसहाय्य
चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : दुर्गापूर येथे दिनांक १२ जुलै रोजी जनरेटर मधील गॅस गळतीमुळे कंत्राटदार रमेश लष्कर यांच्यासह कुटूंबातील सहा जणांचा दुर्देवी मुत्यु झाल्याच्या घटनेतील मृतकांच्या कुटूंबियांना मुख्यमंत्री निधीतुन अर्थसहाय्य प्रदान करावे अशी मागणी विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली होती. दुर्गापूर येथील रहिवासी श्री. रमेश लष्करे यांनी […]


