चंद्रपूर, दि. 4 डिसेंबर : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, चंद्रपूर यांना आर्थिक वर्ष 2020-21 करिता बीज भांडवल योजना, वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजना व गट कर्ज व्याज परतावा योजनेकरिता उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. बीज भांडवल योजनेकरिता भौतीक 45 प्रकरणे, आर्थिक रुपये 33.75 लाख निश्चित केले आहे. तसेच वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजनेकरिता भौतिक 50 प्रकरणे, आर्थिक रुपये 57 लाख व गट कर्ज व्याज परतावा योजनेकरिता भौतीक 12 प्रकरणे, आर्थिक रु. 70.25 लाख उद्दिष्ट निचित केले आहे.महामंडळाच्या विविध योजनांची माहिती www.msobcfdc.org या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. अधिक माहिती करिता शाखा व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य इतर मागावर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जलनगर, चंद्रपूर येथे किंवा दुरध्वनी क्रमांक 07172-262420 यावर संपर्क साधावा असे महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक संजय बावनकर यांनी कळविले आहे.
Related Articles
पावसामुळे घरांच्या पडझड झालेल्या कुटुंबांना आर्थिक मदत – किशोर जोरगेवार
गेल्या आठवड्यापासून होत असलेल्या सततच्या पावसामुळे शहरातील अणेक घरांची पडझड झाली आहे. काही नागरिकांचे पावसामुळे घर जमीनदोस्त झाले असल्याने नागरिकांनी पावसाळ्यातच आपला निवारा गमावला आहे. त्यामुळे आज कल्याणी किशोर जोरगेवार यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने शहरातील अनेक भागाची पाहणी करुन नुकसाणग्रस्त कुटुंबांना आर्थिक व किराणा व राशन कीटची मदत करण्यात आली. चंद्रपूर शहरात मागील चार दिवसांपासून पावसाने जोर मारला आहे. सोसाटयाच्या वा-यासह पावसाला सुरुवात झाली. काही कळण्याअगोदर पावसाचा जोर वाढल्याने नागरिकांची […]
नांदेड येथील पथक तीनही इसमांना घेऊन रवाना
दिनांक ०६ मे २०२० रोजी रात्री दरम्यान माणिकगड गडचांदूर जिल्हा चंद्रपूर येथे नांदेड येथून आलेल्या तीन नागरिकांना संशयावरून जिल्हा प्रशासन व पोलिसाचे मदतीने ताब्यात घेतले होते. पोलीस व कोव्हीड १९ नियंत्रण कक्ष प्रशासनाच्या वतीने नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालय व पोलिसांसोबत संपर्क केला असता चंद्रपूर येथील ताब्यात घेतलेले तीन इसमांचे नावे हि नांदेड येथून पसार झालेल्या […]
जिल्ह्यात 161 कोरोनामुक्त, 56 पॉझिटिव्ह तर 3 मृत्यू
चंद्रपूर,दि.12 जून : गत 24 तासात जिल्ह्यात 161 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली तर 56 जण नव्याने कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. तसेच 3 बाधितांचा जिल्ह्यात मृत्यू झाला आहे. बाधित आलेल्या 56 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 11, चंद्रपूर तालुका 8, बल्लारपूर 8, भद्रावती 5, ब्रम्हपुरी 2 , नागभिड 0, सिंदेवाही 0, […]


