चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

आरोग्य शिबिराच्या पहिल्या दिवशी हजारो नागरिकांनी घेतला आरोग्य शिबिराचा लाभ 35 डॉक्टर आणि 55 वैद्यकीय कर्मचा-यांनी दिली सेवा…

आमदार किशोर जोरगेवार यांच्या पूढाकाराने आयोजित आरोग्य शिबीराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असुन हजारो नागरिकांनी आज या शिबिराचा लाभ घेतला. या आरोग्य शिबिरामध्ये सावंगी मेघे रुग्णालयमनपा आरोग्य विभाग, जिल्हा परिषद आरोग्य विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्याकाय येथील आरोग्य विभाग आणि जिल्हा सामान्य रुग्णालयातील 35 डॉक्टर आणि 55 वैद्यकीय कर्मचा-यांनी सेवा दिली.
       आज सकाळी वाजता या आरोग्य शिबिराला सुरुवात झाली. यावेळी चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवारमनपा आयुक्त विपिन पालिवालशासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.  मिलींद कांबळेजिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळेअतिरिक्त आयुक्त चंदन पाटिलमनपा उपायुक्त अशोक गराडेमनपा वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. वनिता गर्गेलवारडॉ नेहा उत्तरवारयंग चांदा ब्रिगेडचे जिल्हा महानगर अध्यक्ष पंकज गुप्तामहिला शहर संघटिका वंदना हातगावकरयुवती प्रमुख भाग्यश्री हांडेअल्पसंख्याक विभागाचे युथ शहर अध्यक्ष राशेद हुसेनबंगाली समाज महिला शहर संघटिका सविता दंडारेतापोष डेशाईन शेखकल्पना शिंदेचंदा ईटनकरहेरमन जोसेफअॅड. परमहंस यादवदिनेश इंगळेनिलिमा वनकरआशा देशमूखकविता निखारेवैशाली मद्दीवार आदींची उपस्थिती होती.  
तुकूम येथील पंडित दिनदयाल शाळा येथे दोन दिवसीय आरोग्य शिबिराला सुरुवात करण्यात आली आहे. पूढे शहराच्या विविध ठिकाणी आरोग्य शिबिरे संपन्न होणार आहे. आज आयोजित आरोग्य शिबिरामध्ये हजारो स्थानिक नागरिकांनी आरोग्य तपासणी केली. यावेळी ब्लड प्रेशरई.सी.जीमँमोग्राफीब्लड शुगरसर्व प्रकारच्या रक्त चाचण्यामोफत औषधी व तपासणीबाह्यरुग्ण सेवागर्भवती मातांची तपासणीलसीकरणसिकल सेल चाचणी आदी तपासण्या करुन औषधोपचार करण्यात आले. यावेळी तपासणी करिता आलेल्या पात्र नागरिकांना आयुष्यमान भारत जन आरोग्य योजना ई – गोल्डन कार्ड व आभा कार्ड काढून देण्यात आला. तसेच सदर शिबिरामध्ये विविध आजारांबाबत जनजागृती करण्यात आली. उद्या बुधवारी या शिबिराचा समारोप होणार असुन पूढचे शिबिर जून ला बाबूपेठ येथील हिग्लाज भवानी हायस्कुल येथे आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरासाठी नागरिकांनी नोंदणी करुन घेण्याचे आवाहन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.