*गडचिरोली*: संस्थात्मक विलगीकरणात असलेल्या कुरखेडा येथील आणखी ६ व्यक्तींचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह मिळाले. यामध्ये १ महिला व ५ पुरुषांचा समावेश आहे. नागपूर, भंडारा व अमरावती येथून आलेल्या या ६ लोकांचे अहवाल आज दुपारी पॉझिटिव्ह मिळाले. तसेच चामोर्शी येथील १ जण हैद्राबाद येथून स्वगावी आला होता. त्याला चामोर्शी येथे संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले होते. तसेच अहेरी येथे एका नोकरदाराचा स्वजिल्ह्यातून परतल्यानंतर अहवाल पॉझिटीव्ह आला. यातील सर्व प्रवासी संस्थात्मक विलगीकरणात होते.
यामुळे जिल्ह्यातील सक्रिय कोरोना बाधितांची संख्या ८९ झाली. आत्तापर्यंत जिल्ह्यात एकूण ६५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, तर जिल्ह्यात एकूण कोरोना बाधितांची संख्या १५५ झाली आहे. गडचिरोलीत असलेल्या एकुण सर्व ९८ रुग्णांवर वेगवेगळ्या ठिकाणी उपचार सुरु आहेत. यामध्ये ९ जिल्ह्याबाहेरील आहेत.
आत्तापर्यंत जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील सर्व रुग्ण मिळून १६४ कोरोना बाधितांची संख्या झाली आहे.


