गडचिरोली (प्रति)चामोर्शी तालुक्यातील स्थलांतरीत व गरजू लोकांची वाढती संख्या व अचानक आलेल्या मागणी वेळी जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी स्वत: ४६ किराणा कीट देवून मदत केली. शनिवारी जिल्हा टीमकडे चामोर्शी तहसिलदार यांच्याकडून गरजू लोकांना मदत करणे करीता तातडीने मागणी आली. यावेळी विविध सामाजिक संस्थांनी दिलेली मदत वाटप करून झालेली होती. अशा वेळी तात्काळ मदत लागल्याने त्यांनी […]
गडचिरोली
जिल्ह्यात बाहेरून आलेल्यांनी गृह विलगीकरणात रहावे -दीपक सिंगला
गडचिरोली (प्रति) जिल्ह्यात बाहेरून आलेल्या १४२८७ नागरिकांना संचारबंदीमध्ये बाहेर न पडता घरात राहणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यांनी गृह विलगीकरणात रहावे असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले आहे. आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार १४ दिवस त्यांनी घरातच थांबून होम क्वारंटाईन कालावधी पूर्ण करणे गरजेचे आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १५५२ बाहेरून आलेल्या नागरिकांचा होम क्वारंटाईन कालावधी पूर्ण […]
गोरखनाथ समाजाच्या लोकांची आरोग्य तपासणी
चामोर्शी (मवृसे)कोरोना संसर्गाच्या पाश्र्वभूमीवर प्रशासनाच्या वतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना केली जात आहे. अशा स्थितीत चामोर्शी तालुक्याच्या भेंडाळा येथे विश्वशांती विद्यालयालगतच्या मोकळ्या जागेत तात्पूरत्या झोपड्या बांधून गेल्या १५ ते २० दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यातील गोरखनाथ समाजाचे ४० ते ५० कुटुंब वास्तव्यास आहेत. या झोपड्यांमधील सर्व नागरिकांची भेंडाळा प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने आरोग्य तपासणी करण्यात आली. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या लोकांचा […]
अत्यावश्यक खरेदीवेळी सामाजिक अंतराची गरज
गडचिरोली (प्रति)शहरातील नागरिक अत्त्यावश्यक साहित्य खरेदीसाठी एकाच वेळेला गर्दी करीत असल्याने किराणा, मेडिकल व भाजीपाला खरेदी करतांना सामाजिक अंतर ठेवण्यासाठी चौकटी निर्माण करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. देशात सर्वत्र कोरोनाने थैमान घातले असून या संसर्गजन्य रोगामुळे जनतेच्या मनात चांगलीच भीती निर्माण झाली आहे. कोरोना पासून बचाव करण्याच्या हेतूने भाजीपाला, मेडिकल व किराणा साहित्य खरेदीसाठी […]
गडचिरोलीत जमावबंदी आदेश झुंगारून लोक रस्त्यावर; बँकेच्या गेटवर ग्राहकांच्या रांगा
प्रतिनिधी गडचिरोली : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यभरात १४४ कलम लावून जमावबंदी लागू केली. मात्र, गडचिरोलीत जमावबंदी आदेशाला झुगारून लोक रस्त्यावर फिरत असून शहरातील अनेक राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये ग्राहकांच्या रांगा पाहायला मिळत आहेत. अखेर सोमवारी (दि.२३ मार्च) सायंकाळी मुख्यमंत्र्यांनी संचार बंदीचे आदेश लागू केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार २२ मार्च रोजी […]
पोलिसांनी उधळला घातपाताचा कट
प्रतिनिधी गडचिरोली : जिल्ह्यातील हेडरी उपविभागांतर्गत बोडमेटा जंगल परिसरात रविवारी जिल्हा पोलीस व सीआरपीएफच्या जवानांनी नक्षलवाद्यांचा हल्ला परतवून लावत घातपाताचा कट उधळून लावला. यावेळी भूसुरुंग स्फोट घडविण्यासोबतच दोन्ही बाजूने गोळीबार झाला. पण कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, हेडरी पोलीस आणि सीआरपीएफ बटालियन १९१ च्या कंपनी सी चे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित […]
‘कोरोना’बाबत जिल्ह्यात सर्व ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू
प्रतिनिधी गडचिरोली : कोरोनाबाबत जिल्ह्यात सर्व प्रशास नाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना सूरू करण्यात आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ लागू केला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्वच प्रशासनाची मदत घेवून कामांचे वाटपही करण्यात आले आहे. सध्या जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी भीती न बाळगता कोरोना विषाणू संसर्ग टाळण्यासाठी प्रशास […]







