चंद्रपूर (का. प्र ) चंद्रपूर शहरातील बिनबा वार्डातील एक चोवीस वर्षीय युवती कोरोना पॉसिटीव्ह आढळून आली व युवतीच्या आईवर यवतमाळ जिल्ह्यातील एका खाजगी रुग्न्यालयात उपचार सुरु होते ते ९ मे रोजी हे कुटुंब वाहनाने चंद्रपुरात आले. तेव्हापासून हे कुटुंब होम क्वारंटाईन होते. या कुटुंबातील सदस्याचे स्वॅब नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्या कुटुंबातील एका मुलीचा अहवाल बुधवारी पॉसिटीव्ह निघाला त्या कुटुंबातील अन्य सदस्याचे नमुन्याची प्रतीक्षा आहे.



