चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

वीरगती प्राप्त झालेल्या कोविड वीज योध्यांच्या स्मरणार्थ चंद्रपूर वीज केंद्रात “निर्भय शिल्प”

३२ वीज योद्ध्यांच्या परिवाराला आर्थिक सहाय्य १४.२ कोटी धनादेश वितरण

निर्भय शिल्प हे वीज क्षेत्रातील मनुष्यबळामध्ये निरंतर राष्ट्रभावना जागृत ठेवण्याचे, समर्पित कार्य संस्कृतीचे आणि निर्भयतेचे प्रतिक ….संजय मारुडकर

चंद्रपूर  : कोरोना जागतिक महामारीच्या काळात चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातील कार्यरत महानिर्मितीच्या अधिकारी, कर्मचारी, प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी तसेच कंत्राटी कामगारांनी अविरतपणे काम करुन वीजेचे अखंडीत उत्पादन ठेऊन राष्ट्राची सेवा केलेली आहे. कोविड काळात जीविताची पर्वा न करता वीज उत्पादनाच्या राष्ट्रीय कार्यात योगदान देत असताना सन २०१९ ते २०२१ या कालावधीत कोविड संसर्गामुळे मृत्युमुखी पडलेल्या चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातील ३२ कोविड वीज योद्ध्यांच्या स्मरणार्थ विद्युत केंद्राच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ”निर्भय शिल्प” साकारण्यात आले आहे. हे शिल्प वीज क्षेत्रातील मनुष्यबळामध्ये निरंतर राष्ट्र भावना जागृत ठेवण्याचे, समर्पित कार्य संस्कृतीचे आणि निर्भयतेचे प्रतिक असल्याचे महानिर्मितीचे संचालक(संचलन) संजय मारुडकर यांनी प्रतिपादन केले. निर्भय शिल्पाला पुष्पचक्र अर्पण करून वीरगती प्राप्त झालेल्या ३२ वीज योद्ध्यांना याप्रसंगी भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. दिवंगत व्यक्तीच्या परिवाराला म्हणजेच एकूण ३२ कुटुंबांना प्रत्येकी ३० लाख रुपये (कोविडमुळे मृत्यूपोटी) आणि २३ कुटुंबाला प्रत्येकी २० लाख रुपये (गट विमा मुदत योजनेपोटी) असे एकूण १४.२ कोटी अदा करण्यात आले आहे. पंकज सपाटे यांच्या संकल्पनेतून साकारलेले हे अभिनव असे निर्भय शिल्प महानिर्मितीमध्ये बहुदा पहिले असे शिल्प असून वीज उत्पादनाच्या प्रक्रियेत विपरीत परिस्थितीत अहोरात्र मेहनत घेणाऱ्या मनुष्यबळाचे वैयक्तिक महत्व पटवून देणारे आहे हे विशेष. याप्रसंगी प्रभारी कार्यकारी संचालक(कोळसा) राजेश पाटील, कार्यकारी संचालक(सं व सु-२) पंकज सपाटे, मुख्य अभियंता विवेक रोकडे, वीज केंद्राचे उप मुख्य अभियंते, अधिकारी, विभाग प्रमुख तसेच दिवंगत कोविड वीज योद्ध्यांच्या परिवारातील सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.

वीरगती प्राप्त झालेले कोविड वीज योद्धे
अमलेश देशमुख, उपअग्निशमन अधिकारी, नरेश खिमजी भट्टी, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, अविनाश नारायण मेश्राम, उपकार्यकारी अभियंता ,श्रिकृष्ण नामदेव सोनुले, कनिष्ट अभियंता, दादाराव बापुराव शहाने, कनिष्ट अभियंता, सुभाष किसन येरमे, तंत्रज्ञ -१, प्रकाश वनोसा शेंडे, तंत्रज्ञ -१, संतोष दयालराव रणदिवे , तंत्रज्ञ -१,
अशोक चंपतराव जाधव, तंत्रज्ञ -१, राजेश्वर सुरेश ढोले, तंत्रज्ञ -१,पद्माकर रामचंद्र महल्ले, तंत्रज्ञ -१, कामेश्वर वसंतराव नन्नावरे, तंत्रज्ञ -१ , प्रकाश दादाजी मडावी, तंत्रज्ञ -१ , संजय दिगंबर लेकुरवाळे, तंत्रज्ञ -२ ,गुणवंत सुर्यभान मेश्राम, तंत्रज्ञ -२ , विजय भागवत मुंडे, तंत्रज्ञ -२ ,श्री. भाष्कर गणपत चौखे, तंत्रज्ञ -३, गिरीधर मुकुंदराव आरके, तंत्रज्ञ -३ ,गजानन बापुराव गायकवाड, तंत्रज्ञ -३, वसंत राजाराम नन्नावरे, तंत्रज्ञ -३, सुरेश मारोती तलांडे, तंत्रज्ञ -३, कृष्णाराज शंकर पिंपळकर, पहारेकरी,प्रकाश बापुराव डांगे, पहारेकरी, राजेश फिलीप देवघरे, प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी, प्रमोद महादेव चिवंडे, प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी, गुरुदास पाटील, कंत्राटी कामगार ,चंद्रशेखर लहाणुजी खोब्रागडे, कंत्राटी कामगार,दिवाकर बाबुराव सुर्यवंशी, कंत्राटी कामगार,शिलवंत महादेव शंभरकर, कंत्राटी कामगार, सुशील प्रल्हाद शाहा, कंत्राटी कामगार,सुनील वासुदेव बोढे, कंत्राटी कामगार, प्रफुल शांताराम हेलवडे, कंत्राटी कामगार यांचा समावेश आहे.

ह्या भावपूर्ण कार्यक्रमाचे सूत्र संचालन कल्याण अधिकारी आनंद वाघमारे यांनी तर उपस्थितांचे आभार अभय मस्के यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published.