चंद्रपूर (का. प्र.) . शहरातील पागल बाबा चौक येथे चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयाचे बांधकाम सुरु आहे यासाठी छत्तीसगड, मध्यप्रदेश, बिहारचे मजूर शेकडोच्या संख्येने कामावर होते.अशातच लॉकडाउन झाले आणि हे मजूर येथेच अडकले. या सर्व मजुरांची व्यवस्था करण्याची जबाबदारी कंत्राटदाराची होती.मात्र त्याने या मजुराना वाऱ्यावर सोडत पळ काढला. काल मजुरांसाठी छत्तीसगड साठी ट्रेन धावली असल्याचे या मजुराच्या लक्षात आले. माजू शेकडोच्या संख्येने रस्त्यावर उतरले मात्र वेळीच पोलीस प्रशासन आणि तहसीलदार यांच्या मध्यस्थीने त्यांची समजूत काढण्यात आली. यावर तोडगा काढण्यासाठी मजुरांचे काही प्रतिनिधी आणि कंत्राटदाराना चर्चेसाठी रामनगर पोलीस ठाण्यात बोलाविण्यात आले.यात जो अंतिम तोडगा निघणार त्यानुसार मजूर निर्णय घेणार आहेत.
Related Articles
चंद्रपूर, बल्लारपूर व मुल तालुक्यातील अल्पसंख्याक बहुल ग्रामीण क्षेत्राच्या विकासासाठी निधी मंजूर
पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नाचे फलित चंद्रपूर : चंद्रपूर, बल्लारपूर व मुल तालुक्यातील अल्पसंख्याक भागातील मूलभूत सुविधांचा विकास करण्यासाठी निधी मंजूर झाला आहे. राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नामुळे अल्पसंख्याक भागातील पायाभूत सुविधांचा विकास करण्यात येणार आहे. चंद्रपूर तालुक्यातील दुर्गापूर येथे वॉर्ड क्रमांक 1 मध्ये सेंट मायकल चर्चची […]
अनुप्रवर्तन सोहळ्यानिमित्त अस्थिकलश मिरवणूक
ऐतिहासिक दीक्षाभूमी येथे धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळ्यानिमित्त रविवारी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाची सकाळी ११. ३० वाजताच्या सुमारास भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी समता सैनिक दलाच्या सैनिकांनी पथसंचलन करुन मानवंदना दिली. हजारो बौद्ध बांधवांनी बाबासाहेबांच्या अस्थिकलशाला वंदन करून ‘जयभीम’ चा नारा दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटीच्या […]
वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान म्हणून मूल नगर परिषदेला 50 लक्ष रुपयांचा निधी मंजूर
पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नाचे फलित चंद्रपूर : नगर परिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान या योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील मूल नगर परिषदेला 50 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यात मुख्य रस्त्यावरील वाल्मिकी नगरातील स्वागत गेटचे बांधकाम करण्यात येणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्यामुळे सदर निधी मंजूर झाला असून या प्रकल्पांतर्गत […]



