चंद्रपूर (का. प्र.) . शहरातील पागल बाबा चौक येथे चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयाचे बांधकाम सुरु आहे यासाठी छत्तीसगड, मध्यप्रदेश, बिहारचे मजूर शेकडोच्या संख्येने कामावर होते.अशातच लॉकडाउन झाले आणि हे मजूर येथेच अडकले. या सर्व मजुरांची व्यवस्था करण्याची जबाबदारी कंत्राटदाराची होती.मात्र त्याने या मजुराना वाऱ्यावर सोडत पळ काढला. काल मजुरांसाठी छत्तीसगड साठी ट्रेन धावली असल्याचे या मजुराच्या लक्षात आले. माजू शेकडोच्या संख्येने रस्त्यावर उतरले मात्र वेळीच पोलीस प्रशासन आणि तहसीलदार यांच्या मध्यस्थीने त्यांची समजूत काढण्यात आली. यावर तोडगा काढण्यासाठी मजुरांचे काही प्रतिनिधी आणि कंत्राटदाराना चर्चेसाठी रामनगर पोलीस ठाण्यात बोलाविण्यात आले.यात जो अंतिम तोडगा निघणार त्यानुसार मजूर निर्णय घेणार आहेत.
Related Articles
मंदाकिनी गोविंदराव नालमवार यांचे दुःखद निधन
चंद्रपूर (का.प्र.)चंद्रपूर येथील प्रतिष्ठीत नागरिक स्व. श्री. गोविंदराव नालमवार यांच्या पत्नी मंदाकिनी गोविंदराव नालमवार यांचे वृध्दापकाळाने आज दि. २६ मार्च २०२० रोजी दुपारी १ वा. दुःखद निधन झाले. मृत्युसमयी त्यांंये वय ८५ वर्ष होते. त्या न्यु भारत तांत्रिक प्रशिक्षण संस्थेच्या संचालिका होत्या. त्या अंतर्गत त्या स्लम एरियात बालवाडी व पाळणाघर चालवित होत्या. व आपल्या परिने […]
24 तासात 77 कोरोनामुक्त 44 नव्याने पॉझिटिव्ह
गत 24 तासात 77 कोरोनामुक्त 44 नव्याने पॉझिटिव्ह आतापर्यंत 21,269 बाधित झाले बरे उपचार घेत असलेले बाधित 551 चंद्रपूर, दि. 27 डिसेंबर : जिल्ह्यात मागील 24 तासात 77 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 44 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली आहे.जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 22 हजार 179 […]
शुक्रवारी प्रियदर्शिनी सभागृहात वाद विवाद स्पर्धा ना.सुधीर मुनगंटीवार यांची उपस्थिती
आत्मनिर्भर भारत भाजपाचे आयोजन येथील भारतीय जनता पार्टीच्या आत्मनिर्भर भारत आघाडी तर्फे विदर्भ स्तरीय ‘आवाज विदर्भाचा’ या वाद विवाद स्पर्धेचे आयोजन विविध स्तरावर करण्यात आले.उपांत्य फेरीसाठी निवड झालेल्या चमुची पुढील फेरीसाठी ही स्पर्धा 11 ऑगस्ट ला सकाळी 10 वाजता प्रियदर्शिनी नाट्य सभागृह येथे होणार असून या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राज्याचे वन,मत्स्यपालन व्यवसाय व सांस्कृतिक […]


