चंद्रपुर

24 तासात 77 कोरोनामुक्त 44 नव्याने पॉझिटिव्ह

गत 24 तासात 77 कोरोनामुक्त
44 नव्याने पॉझिटिव्ह
 आतापर्यंत 21,269 बाधित झाले बरे
 उपचार घेत असलेले बाधित 551
चंद्रपूर, दि. 27 डिसेंबर : जिल्ह्यात मागील 24 तासात 77 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 44 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली आहे.जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 22 हजार 179 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 21 हजार 269 झाली आहे. सध्या 551 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 69 हजार 945 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 44 हजार 831 नमुने निगेटीव्ह आले आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत 359 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 332, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 16, यवतमाळ सात, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.आज बाधीत आलेल्या 44 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 17, चंद्रपूर तालुक्यातील तीन, बल्लारपुर एक, भद्रावती चार, नागभीड तीन, सिंदेवाही एक, राजूरा एक, चिमुर सहा, वरोरा चार, कोरपना तीन व इतर ठिकाणच्या एका रुग्णांचा समावेश आहे.कोरोना अजून गेलेला नाही त्यामुळे नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक राहावे, बाहेर निघतांना नियमितपणे मास्कचा वापर करावा, वेळोवेळी हात स्वच्छ करावे तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *