लॉयड्स कंपनी कामगाराची आत्महत्या
घुग्घूस : कालिदास सीताराम धांडे (27) रा. शेणगाव आज विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. राहते घरीच विषारी द्रव्य प्रशान केल्याने त्यास चंद्रपूर येथे उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला.
शेणगाव येथील शेतात कंपनीचे टॉवर लागल्याने त्या जागेवर हा इसम लॉयडस मेटल कंपनीत कामावर लागला होता.
मागील 7 वर्षा पासून तो कंपनीत काम करीत होता. आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही.
पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदना साठी चंद्रपूर येथे पाठवीला आहे.



