चंद्रपुर

पुढील आदेश येईपर्यंत विनापरवाना कोणतीही दुकाने उघडू नका-जिल्हाधिकारी

चंद्रपूर (का.प्र.)- जिल्ह्यामध्ये एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही. तसेच केंद्रीय गृह विभागाने काही सूचना दिल्या असल्यामुळे लॉक डाउनमध्ये शिथीलता आली,असे समजायचे कारण नाही. राज्य शासनाकडून अधिकृत आदेश आल्याशिवाय ज्यांना लिखित परवानगी दिलेली नाही. अशा कोणत्याही व्यापारी प्रतिष्ठानाना उघडू नये. जिल्ह्यातील लॉक डाऊन ३ मेपर्यंत कायम आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे लॉक डाऊनच्या काळात जिल्ह्यातील नागरिकांसाठी जारी केलेल्या आजच्या व्हिडीओ संदेशमध्ये काही ठिकाणी परस्पर दुकाने उघडण्याचा प्रयत्न झाल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. लॉक डाऊनमध्ये कोणतीही शिथिलता दिल्या गेलेली नाही. त्यामुळे लिखित परवानगी दिल्या गेलेल्या व्यापारी प्रतिष्ठानाशिवाय अन्य दुकाने उघडण्यात येऊ नये. राज्य शासनाकडून अधिकृत निर्णय आल्यानंतर व जिल्हा प्रशासनाने त्या संदर्भात लेखी आदेश दिल्यानंतरच याबाबतचा निर्णय घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात अद्याप एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही. मात्र नागपूर व यवतमाळ या दोन जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे दोन्ही जिल्ह्याच्या सीमा सील असून कोणीही प्रवेश केल्यास १४ दिवस कॉरेन्टाईन करण्यात येत आहे. त्यामुळे यातल्या प्रत्येक नागरिकांनी प्रशासनासोबत डोळ्यात तेल घालून आत मध्ये एकही चूक होणार नाही याकडे लक्ष वेधण्याचे स्पष्ट केले आहे. गावामध्ये अचानक साथ उद्भवल्यास काय करायचे, कशा पद्धतीने व्यवस्था करायची, यासाठी आज चंद्रपूर शहरातील तीन प्रभागांमध्ये रंगीत तालीम करण्यात आली. याशिवाय जिल्ह्याच्या विविध भागात देखील मॉक डिड्ढल अर्थात रंगीत तालीम करण्यात आली. यामुळे शहरातील अनेक भाग सील करण्यात आले होते. मात्र शहरात रुग्णांची वाढ झाल्याची अफवा काहींनी पसरवली असून अशा लोकांवर देखील कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.