
चंद्रपूर (का.प्र.)- जनहित याचिकेच्या माध्यमातून उच्च न्यायालय नागपूर खंडपिठाने चंद्रपूर व यवतमाळच्या शासकिय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये कोरोनाची चाचणी करण्याकरीता व्हीआरडीएल ही प्रयोगशाळा उपलब्ध केली असून महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागातर्फे ही प्रयोगशाळा चंद्रपूर व यवतमाळला येत्या २० मे पर्यंत सुरू करण्याची उच्च न्यायालयात लेखी ग्वाही दिली. याला लागणारी सिंगापूरवरून येत असल्यामुळे विलंब झाल्याची कबुली सुध्दा महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने दिली आहे. उच्च न्यायालयाने केंद्र सरकार व विभागीय आयुक्तांना ही प्रयोगशाळा लवकरात लवकर सुरू करण्याची सुचना दिली. म्हणजेच चंद्रपुरचे शासकिय वैद्यकीय महाविद्यालय व आता कोरोना चाचणी मशिन जनहित याचिकेच्या माध्यमातूनच उच्च व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे उपलब्ध होत असल्यामुळे जनता समाधानी असून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करीत आहे. तसेच याकरीता येणारा खर्च हा (खनिज विकास निधी) माईनिंग रॉयल्टीमधून होत असल्यामुळे प्रशासनाच्या निर्णयाचे स्वागत.


