चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

अबब ! नोकरदाराने दुधवालीला चक्क दिल्या नकली नोटा.

गोंडपिपरी (चंद्रपूर) : पैसे वाचविण्याकरिता कोण काय करतील याचा नेम नाही. महिनाभर दुधाचे बिल देतांना एका नोकरदाराने दुधवालीला चक्क मुले खेळतात त्या नोटा दिल्या. तिनेही न बघता नोटा ओट्यात घातल्या. घरी गेल्यावर पैसे मोजतांना त्या बनावटी नोटा बघून बाईचा पारा भडकला. पण अनेक महिनावारी ग्राहक असल्याने नोटा नेमक्या कुणी दिल्या. याबाबत शासंकता होती. परिणामी डोक्यावर हात मारल्याशिवाय पर्याय उरला नाही. आता ती दुधवाली आपल्यासोबत घडालेला प्रकार सांगत अशा प्रवृत्तीविरोधात संताप व्यक्त करीत आहे. गोंडपिपरीत नुकत्याच समोर आलेल्या या प्रकाराने व्यवस्थेत पैसे वाचविण्यासाठी लोक कशी पातळी गाठतात याची अनुभूती दिली आहे. गोंडपिपरी येथील निर्मलाबाई नगारे या पंचावन्न वर्षीय महिला दुधविक्रीचा व्यवसाय करतात. अनेक नौकरदार कुटुंबियांना त्या महिनावारी दुध पुरवितात. महिना भरला कि त्यांच्याकडून महिनाभराची रक्कम त्या घेतात. मागील महिला भरल्याने त्या बिलाची रक्कम जमा करीत होत्या. दरम्यान अनेक कुटुंबियांकडून रक्कम जमा झाल्यानंतर त्या घरी पोहचल्या. अन एकून रक्कम मोजायला लागल्या. यात लहान मुले खेळतात त्या दोनशे रूपयाच्या दोन नोटा आढळून आल्या. हे बघताच त्यांचा पारा भडकला. दुधाच्या बिलाची रक्कम देतांना घडलेल्या या प्रकाराबाबत त्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला. शासकिय नौकरीत असलेल्यांकडून असा प्रकार घडल्यानंतर आता ती महिला आपली आपबिती सांगत सुटली आहे.आपले पैसे वाचविण्याकरिता कोण काय करतील याचा नेम नाही. दुधाचे बिल देण्यासाठी लहान मुलांच्या खेळण्याची बनावट नोटा; देणारा हा नौकरदार महाशय कोण याबाबत आता चर्चा सूरू आहे. दुधाचा व्यवसाय हा अतिशय जिकरीचा असतो.पहाटेपासून दिवसभर कुटुंबातील अनेक सदस्यांच्या प्रंचड मेहनतीतून दुधविक्रीतून महिनभरानंतर त्यांना एकत्रीत रक्कम मिळते. अशावेळी दुधाच्या बिलाची रक्कम देतांना बनावटी नोटा दिल्याच्या घटनेने आता संताप व्यक्त केल्या जात आहे. दुधविक्री करणाऱ्या निर्मलाबाईंनी यांसदर्भात चिड व्यक्त केली आहे

Leave a Reply

Your email address will not be published.