
माळी महासंघाच्या लढ्याला यश
मुल – १ जानेवारी १८४८ रोजी भारतातील मुलींची पहिली शाळा महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांनी भिडेवाडा, पुणे येथे सुरू केली. या भिडेवाड्याचे रूपांतर राष्ट्रीय स्मारकात करण्यात यावे अशा प्रकारचा लढा गत नऊ वर्षांपासून माळी महासंघ देत आहे. अखेर शासनाने ९ मार्चला सादर केलेल्या अर्थसंकल्पात भिडेवाडा येथे राष्ट्रीय स्मारक निर्माण करण्यासाठी ५० कोटींची तरतूद केली.
भिडेवाडा येथे राष्ट्रीय स्मारक व्हावे याकरिता सर्वप्रथम माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश ठाकरे यांनी नऊ वर्षांपासून भिडेवाडा ते फुलेवाडा अशी रॅली काढून समाजाचे व शासनाचे लक्ष वळविले. अविनाश ठाकरे यांनी २ मार्चला उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माळी महासंघाचे पत्र देऊन भिडेवाडा येथे राष्ट्रीय स्मारकासाठी ५० कोटींची तरतूद करण्यात यावी, अशा आशयाचे पत्र दिले होते.
या पृष्ठभूमीवर शासनाने अर्थसंकल्पात भिडेवाडा येथे राष्ट्रीय स्मारकासाठी ५० कोटींची तरतूद करणे हे निश्चितपणे माळी महासंघाचे यश आहे, अशी भावना प्रदेशाध्यक्ष अरुण तिखे यांनी व्यक्त केली. यामध्ये माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश ठाकरे, राष्ट्रीय सचिव रवींद्र अंबाडकर, प्रदेशाध्यक्ष अरुण तिखे, राष्ट्रीय कोषाध्यक्ष प्रा. नानासाहेब कांडलकर, उपाध्यक्ष काळूरामअण्णा गायकवाड, संतोष लोंढे, प्रदेश सचिव भारत माळी, कैलास महाजन, संतोष जमदाडे, प्रदेश उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. नामदेवराव कोकोडे, कोषाध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण गोरडे, विभागीय अध्यक्ष चंद्रकांत बोरकर, महिला आघाडी कार्याध्यक्ष माजी जी.प.अध्यक्ष संध्याताई गुरनुले, डॉ.संजय घाटे,माजी जी.प.सदस्य प्रा.रामभाऊ महाडोरे चंद्रपूर महानगर पालिका माजी सदस्या वंदना तीखे, विभागीय महासाचिव गुरु गुरनुले, रवी गुरनूले, चंद्रपूर अध्यक्ष नीलेश खरबडे, मुल तालुका अध्यक्ष राकेश ठाकरे, गुरुदास चौधरी, बंदुभाऊ गुरनुले, सुधीर नागोशे, यांचेसह चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक माळी समाज बांधवांचा समावेश आहे.