
खासदार बाळू धानोरकर यांच्या हस्ते नवनियुक्त संचालकांच्या सत्कार
चंद्रपूर : ग्रामीण भागातील आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी सेवा सहकारी संस्थेचे जाळे अतिशय महत्वाचे आहे. त्यामुळे तेथे सहकार क्षेत्रातील अभ्यास असलेले संचालक निवडून आल्यास अधिक प्रभावी पणे समाजातील शेवटच्या घटकाला न्याय देता येणार असल्याचे मत खासदार बाळू धानोरकर यांनी व्यक्त केले.
खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभाताई धानोरकर हे नेहमी समाजातील सर्वच घटकांना न्याय देण्याकरिता प्रयत्नरत असतात. त्यांच्या मार्गदर्शनात चालबर्डी सेवा सहकारी संस्थेवर काँग्रेस प्रणित किसान विकास पॅनल विजयी झाला आहे.
आज वरोरा येथील धानोरकर जनसंपर्क कार्यालयात नवनियुक्त संचालकाच्या सत्कार खासदार बाळू धानोरकर यांच्या हस्ते करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी विजयी उमेदवारांमध्ये हंसराज सुखदेवे, संचित जोगी, अशोक ताजने, मारोती नागपुरे, सुभाष गिरसावळे, विठ्ठल जीवतोडे, गुणवंत महाकुलकर, भूपेंद्र ताजने, अरविंद ताजने, विनोद इखारे, चंद्रकला इखारे, सुशीला नागपुरे, विलास सोनटक्के यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी चालबर्डी उपसरपंच गणेश नागपुरे, चपराळा सरपंच विलास लोडांगे, सुरेश गिरसवाळे, रामचंद्र नागपुरे, संदीप मशारकर, मनोज गाडगे, पवन ठमके, सदानंद तापने, पुंडलिक जोगी, सतीश मालेकर, आशिष नागपुरे, आशिष डाहुले, अमोल कोवे, साईनाथ नागपुरे, वैभव जोगी, साईनाथ नागपुरे, सतीश नागपुरे , सुरेश इखारे, निलेश नागपुरे, चंद्रशेखर नागपुरे यांची उपस्थिती होती.