चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

सलग दुसऱ्या वर्षी दिक्षाभूमीवरील धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा नाही …!

नागपूर(विद्यांश न्युज) :- १४ ऑक्टोम्बर १९५६ साली नागपूरच्या पवित्र अशा दीक्षाभूमीवर महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी पूज्य भदन्त चंद्रमनी महास्थवीर यांच्या हस्ते धम्मदीक्षा घेतली व आपल्या लक्षावधी अनुयायांना बौध्द धम्माची दीक्षा दिली तसेच १६ ऑक्टोम्बर १९५६ ला चंद्रपूर मुक्कामी धम्मदीक्षेचा सोहळा बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या सहकार्यातून आयोजित करण्यात आला होता मात्र मार्च २०२० पासून देशभरात धुमाकूळ घालत असलेल्या कोरोना या विषाणूजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षी नागपूरच्या दिक्षाभूमीवरील धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा सोहळयाचे आयोजन करता येणार नाही.

राज्य शासनाने आरोग्य विभागाने मोठ्या संख्येने गर्दी होण्याऱ्या धार्मिक कार्यक्रमाच्या आयोजनावर निर्बंध घातले आहे. त्यामुळे दरवर्षी अशोक विजयादशमीच्या पर्वावर नागपुरात होणारा धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ्याचे आयोजन यावर्षी होणार नाही या संदर्भात नागपूर जिल्हा प्रशासनाने प्रसिध्दी पत्रक जाहीर केले आहे यानुसार राज्य शासनाने २४ सप्टेंबर रोजी निर्देशित केलेल्या धार्मिक स्थळे सुरू करण्याबाबतच्या सूचना क्रमांक(४) नुसार मोठ्या प्रमाणावर गर्दी होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमांना प्रतिबंधित केले आहे. यानुसार नागपूर जिल्हा प्रशासनाने ३० सप्टेंबरला डॉ.बाबासाहेब आंबेडकर दीक्षाभूमी स्मारक समिती व कामठी येथील ड्रॅगन पॅलेस टेम्पल समितीची बैठक घेण्यात आली राज्य शासनाच्या निर्देशानुसार मोठ्या प्रमाणावर गर्दी टाळण्याबाबतच्या सूचना आहेत राज्य शासनाने जरी ७ ऑक्टोम्बर पासून धार्मिक स्थळ सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी मोठया संख्येने नागरिक जमा होण्यास प्रतिबंध घातला आहे त्यामुळे येत्या १४ व १५ ऑक्टोम्बरला धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने नागपुरात मोठ्या संख्येने अनुयायी येऊ शकतात त्यामुळे कोविड-१९ चे निकष पाळणे शक्य होणार नाही त्यामुळे यावर्षीचा धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा अभिवादन सोहळा यावर्षी होऊ शकणार नाही असे प्रशासनाने कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.