जिल्ह्यात 8 पॉझिटिव्ह तर ॲक्टीव्ह रुग्ण 42
गत 24 तासात जिल्ह्यात 8 जण नव्याने पॉझिटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात रविवारी एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही.
आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या 8 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 3, चंद्रपूर तालुका 1, बल्लारपूर 2, भद्रावती 1, ब्रम्हपुरी 0, नागभीड 0, सिंदेवाही 0, मुल 1, सावली 0, पोंभूर्णा 0, गोंडपिपरी 0, राजूरा 0, चिमूर 0, वरोरा 0, कोरपना 0, जिवती 0 व इतर ठिकाणच्या 0 रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 88 हजार 752 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 87 हजार 169 झाली आहे. सध्या 42 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 7 लाख 4 हजार 802 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 6 लाख 14 हजार 653 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1541 बाधितांचे मृत्यू झाले आहे.


