चंद्रपुर

गत 24 तासात 184 कोरोनामुक्त 96 नव्याने पॉझिटिव्ह ; दोन मृत्यू

आतापर्यंत 19,681 बाधित झाले बरे
 उपचार घेत असलेले बाधित 1,118
चंद्रपूर, दि. 10 डिसेंबर : जिल्ह्यात मागील 24 तासात 184 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 96 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून एक कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 21 हजार 129 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 19 हजार 681 झाली आहे. सध्या एक हजार 118 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 58 हजार 347 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 35 हजार 146 नमुने निगेटीव्ह आले आहेत.
आज मृत झालेल्यांमध्ये भद्रावती येथील 86 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 330 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 304, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 15, यवतमाळ सात, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.
आज बाधीत आलेल्या 96 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 37, चंद्रपूर तालुक्यातील सहा, बल्लारपुर एक, भद्रावती आठ, ब्रम्हपुरी सहा, नागभीड एक, मुल सहा, पोंभुर्णा एक, गोंडपिपरी चार, राजुरा सात, चिमुर पाच, वरोरा आठ, कोरपना एक तसेच इतर ठीकाणच्या पाच रुग्णांचा समावेश आहे.
नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक राहावे, बाहेर निघतांना नियमितपणे मास्कचा वापर करावा, वेळोवेळी हात स्वच्छ करावे तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *