चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

…वाघाच्या बंदोबस्तासाठी वनविभागाला पाच दिवसांचा शेतकऱ्याचा अल्टीमेटम …

पालकमंत्री, उपवनसंरक्षक व उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन

चंद्रपूर :  मागील दोन दिवासात दोघांचा बळी आणि एका शेतकऱ्याला जखमी केलेल्या पट्टेदार वाघाचा पाच दिवसात बंदोबस्त करावा असा अल्टीमेटम जंगलव्याप्त क्षेत्रातील शेतकऱ्यांनी आज बुधवारी (15 जून) ला वनविभागाल देण्यात आलेला आहे.  पाच दिवसात वाघाचा बंदोबस्त करण्यात आला नाही तर वनविभागाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. त्यामुळे वनविभाग येणाऱ्या पाच दिवसात वाघाच्या बंदोबस्तासाठी काय उपाययोजन करते याकडे सर्वांचे लक्ष लागल आहे. दोन दिवसात दोघांचा बळी व एकाल जखमी केल्याने नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. पाच दिवसानंतर वनविभागाच्या कार्यालय समोर 21 जून पासून  ठिय्या आंदोलन व पालकमंत्री विजय वड्डेटीवार यांच्या ब्रम्हपुरी येथील जनसंपर्क कार्यालयसमोर तीव्र निदर्शने करण्यात येणार असल्याची माहिती किसान सभेचे जिल्हा सचिव विनोद झोडगे यांनी दिला आहे. त्यांनी आज पालकमंत्री, उपवनसंरक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन दिले आहे प्राप्त माहिती नुसार, ब्रम्हपूरी तालुक्यातील हळदा, बोडधा, कुडेसावली, मुडझा, बलारपुर, आवळगाव, वांद्रा, चीचगाव सह अनेक गावे जंगलव्याप्त आहेत. लागूनच शेजारी वैनगंगा नदी आहे. या गावच्या जंगलात  वाघ व बिबट या हिंस्त्र प्राण्यांचा वावर आहे. हे सर्व गावे कृषी प्रधान असून संपूर्ण शेती ही जंगल परिसरात व वैनगंगा नदीचे शेजारी आहे. शेतकऱ्यांना मशागतीचे कामे करण्याकरीता जावेच लागते. त्या वेळात जंगलात व नदीचे परिसरात दबा धरून बसलेले वाघ शेतीचे कामे करीत असलेल्या शेतकऱ्यांवर हल्ला चढवून त्यांना जिव घेत आहेत. रात्रीच्या वेळात वाघ गावात प्रवेश करून जनावरे,शेळ्यांना फस्त करीत आहेत. हळदासह परिसरातील शेतकरी भयभीत झाली आहेत. वाघापासून संरक्षण मिळविण्याकरीता वारंवार वनविभागाकडे पाठपुरावा सुरू आहे परंतु या आदी गावांचा वाघांपासून संरक्षण मिळणे फारच कठीण झाले आहे. आतापर्यंम 28 मार्च ला बोडधा येथील कवडू मेश्राम, एप्रिल महिन्यात आवळगाव येथील तुळशीराम कामडी त्यानंतर 11 जून रोजी आवळगाव येथील क्षेत्रसहाय्यक करंडे यांच्यावर हल्ला झाला. यामध्ये ते थोडक्यात बचावले. दुसऱ्याच दिवशी 12 जून रोजी हळदा येथील राजेंद्र अर्जुन कामडी व 14 जून 2022 रोजी त्याचं गावातील देविदास परशराम कामडी यांचा वाघाच्या हल्ल्यात बळी गेला आहे. त्यांच्या सोबत असलेला शेतकरी थोडक्यात बचावला तर हळदा येथील नानु राऊत गंभीर जखमी झाला आहे. ब्रम्हपूरी तालुक्यातील जंगलव्याप्त अनेक गावांमध्ये मागील वर्षभरापासून सुमारे 20 शेतकऱ्यांचा बळी गेला आहे. सध्या पावसाळ्याचा हंगाम सुरू झाल्याने लोकांना आपल्या शेतीच्या हंगामाची कामे पार पाडावी लागत आहेत. निर्माण झालेल्या भितीमय अश्या परिस्थितीने शेतकरी भयभित झाले आहे. वाघांची दहशत आता जंगल सोडून गावशेजारी दिसून येत आहे. या सर्व बाबींचा वनविभाग प्रशासनाने गांभीर्याने विचार करून सातत्याने हल्ले करणाऱ्या वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी जंगलव्याप्त भागातील शेतकऱ्यांनी वनविभागाल केली आहे. बंदोबस्त करण्यास विलंब केल्यास पाच दिवसानंतर वनविभागाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. बुधवारी वनविभाग कार्यालयात जावून किसान सभेचे जिल्हा सचिव विनोद झोडगे, महेंद्र ज्ञानवाडकर, हळदा येथील सरपंच दौलत गरमडे, उपसरपंच संजय लोणारे, ग्राम पंचायत सदक्ष धनराज लोणारे, प्रमोद भोयर, कालिदास इटनकर, ज्ञानेश्वर झरकर, मिनाक्षी गेडाम, रुपाली नखाते, सविता कामडी, लोमेश चदनखेडे, पितांबर म्हस्के, वांद्रा येथील रोशन नवघडे, लतीफ लोणारे, सचिन रामटेके, सुरेखा राऊत, सुनीता भाऊराव शेंडे वाघाच्या बंदोबस्तासाठी उपाययोजना करण्याची मागणी निवदेनाद्वारे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.