चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी “अम्मा का टिफिन” उपक्रमाला दिली भेट.

राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार हे आज चंद्रपूर दौ-यावर असतांना त्यांनी आमदार किशोर जोरगेवार यांच्या निवासस्थानी पोहचत अम्माची भेट घेत अम्मा का टिफिन या उपक्रमाबद्दल माहिती जाणुन घेतली. गरजवंतांसाठी सुरु असलेल्या अम्मा का टिफिन या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे, आमदार मनोहर चंद्रिकापुरेआमदार राजु कारेमोरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ग्रामीण चंद्रपूर जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य,  शहर जिल्हाध्यक्ष राजिव कक्कड, नगरसेवक दीपक जयस्वालमाजी नगरसेवक बलराम डोडाणी, संजय वैद्यरोटरी क्लब चंद्रपूरचे प्रकल्प प्रमुख अजय जयस्वाल, आदिंची उपस्थिती होती.

      महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार आज पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी आमदार किशोर जोरगेवार यांच्या राजमाता निवासस्थानी भेट देत अम्माची म्हणजेच गंगुबाई जोरगेवार यांची भेट घेतली. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून चंद्रपुरात सुरु करण्यात आलेल्या अम्मा का टिफिन या उपक्रमाचीही त्यांनी पाहणी केली. यावेळी सदर उपक्रमाबद्दल त्यांनी संपूर्ण माहिती जाऊन घेतली. सदर उपक्रमाच्या माध्यमातून दररोज १०० टिफिन गरजूंच्या घरी पाठविले जात आहे. विषेश म्हणजे यात सातत्य असने ही मोठी गोष्ट असल्याचे सांगत या उपक्रमाचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कौतुक केले. यावेळी सदर टिफिनही उघडुन पाहत जेवणाच्या दर्जाचे कौतुक केले. या प्रसंगी अजित पवार यांनी अम्माच्या प्रकृतीची विचारपुस करत यावेळी अम्मानेही मनमोकळेपणाने अजित पवार यांच्याशी बातचित केली. अम्माने गरिबीचे चटके सोसत कष्टाने कुटुंबाला सक्षम केले आहे. अम्माने आपल्या टोपल्या विकण्याचा व्यवसाय आजही सुरुच ठेवला आहे. याचेही अजित पवार यांनी कौतुक केले. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी शालपुष्पमालाबांबू निर्मित तिरंगा ध्वजसंविधान पुस्तिकाग्रामगीतादेत अजित पवार यांचे स्वागत केले. या प्रसंगी यंग चांदा ब्रिगेडचे महानगर जिल्हाध्यक्ष पंकज गुप्तामहिला शहर संघटिका वंदना हातगावकरयुथ शहराध्यक्ष कलाकार मल्लारपयुवा नेते अमोल शेंडे अल्पसंख्यांक विभागाचे शहराध्यक्ष सलिम शेखअल्पसंख्याक युथ शहराध्यक्ष राशेद हुसेनबंगाली समाज शहराध्यक्ष विश्वजित शाहाकरणसिंह बैसराम जंगमनकुल वासमवारमुन्ना जोगीप्रविन पिंपळशेंडेराम मेंढेनितिन शाहाविक्की रेगंटीवारगौरव जोरगेवारदिनेश इंगळेअल्पसंख्याक विभागाच्या महिला शहराध्यक्ष कौसर खानसायली येरणेआशा देशमुखविमल कातकरशमा काजीअस्मिता डोणारकरवंदना हजारे यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published.