चंद्रपुर

चंद्रपूर,गडचिरोली,वर्धा,भंडारा हे जिल्हे ग्रीन झोन घोषित करून अंतर्गत बाजारपेठा सुरू करा -खा. बाळू धानोरकर

चंद्रपूर (का.प्र.) विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा आणि भंडारा या जिल्ह्यांतील परिस्थिती समाधानकारक आहे. एकही पॉझिटीव्ह कोरोनाचा रुग्ण या भागात आढळून आला नाही. त्यामुळे हे चारही जिल्हे ग्रीन झोन जाहीर करून या जिल्ह्यांतील आंतरजिल्हा बाजारपेठ सुरू करावी, अशी मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी केली आहे. यासंदर्भातील निवेदन त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे. मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, देशात व राज्यात मोठ्या प्रमाणावर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहे. अनेकांचे मृत्यूही यामुळे झाले आहेत.

सध्या प्रशासन परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा आणि भंडारा या चार जिल्ह्यांत अद्याप केरोनाचा एकही रुग्ण आढळून आला नाही. सध्या या चारही जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात आहे. त्यामुळे या चारही जिल्ह्यांना ग्रीन झोन घोषित करून आंतरजिल्ह्यातील बाजारपेठ सुरू कराव्यात, अशी मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनातून केली आहे. या निवेदनाच्या प्रती चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा आणि भंडारा जिल्ह्याच्या जिल्हाधिकाèयांना पाठविण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.