चंद्रपुर

अन्य जिल्ह्यातून आलेल्यांना परवानगी व तपासणी शिवाय प्रवेश नाही-जिल्हाधिकारी

चंद्रपूर (का.प्र.) देशात राज्यात व लगतच्या काही जिल्ह्यांमध्ये कोरोना पॉझिटिव रुग्णांची वाढ होत आहे. अशा जिल्ह्यांमधून कोणालाही प्रवेश मिळणार नाही. पोलीस व प्रशासनाची परवानगी असल्याशिवाय चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अन्य कोणत्याही जिल्ह्यातून व राज्यातून प्रवेश करता येणार नाही. तसेच चंद्रपूरच्या नागरिकांना जाता येणार नाही. येणाèया काळात सण-उत्सव, धार्मिक कार्यक्रम रद्द करावे. अजयपुर येथे अशा कार्यक्रमाचे आयोजन करणाèया पोलीस पाटलांवर कारवाई करण्यातआली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी आज दिली. चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांशी व्हिडिओ संवाद साधतांना त्यांनी काल अजयपुर येथे झालेल्या घटनाक्रमाला बद्दल खेद व्यक्त केला.

परिस्थिती अत्यंत बिकट आहे. त्यामुळे कोणत्याही धार्मिक कार्यक्रमांचे सण उत्सवांचे आयोजन आपल्या स्वतःसाठी व आपल्या परिवारासाठी घातक ठरू शकतात. त्यामुळे अशा पद्धतीने चंद्रपूर शहर किंवा चंद्रपूर जिल्ह्यातील कोणत्याही गावात कोणीही कार्यक्रम आयोजित करण्याचे धाडस दाखवत असेल तर याबाबत वेगवेगळ्या नियंत्रण कक्षाच्या क्रमांकावर माहिती द्यावी. सध्या चंद्रपूर जिल्हा कोरोना मुक्त आहे. पुढील काळात कोणतीही घुसखोरी होणार नाही. अन्यथा जिल्ह्यातील नागरिकांना विनाकारणत्याची किंमत चुकवावी लागेल, चुकीच्या पद्धतीने वागू नये, असे विनम्र आवाहन त्यांनी केले आहे.

जिल्ह्याचा सीमावर्ती भाग सील करण्यात आलेला आहे. त्यामुळे सीमावर्ती भागातील नागरिकांनी देखील आपल्या गावात कोणी अनोळखी व्यक्ती व आजारी व्यक्ती दिसला तर त्याची माहिती शासकीय यंत्रणेला द्यावी. सोबतच जिल्ह्यात कोणाची उपासमार होणार नाही. यासाठी अल्पदरात धान्याचे वितरण तसेच शिवभोजन योजना सुरू करण्यात आली आहे. याचा नागरिकांनी लाभ घ्यावा. पुढील ३० तारखेपर्यंत आपल्या घरातील कोणीच बाहेर पडणार नाही. याची खबरदारी घरातील ज्येष्ठांनी देखील घ्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *