देश दुनिया

देशात कोरोना रुग्णांची संख्या ४,४२१

कोरोनाने जगातील अनेक देशांसह भारतातही हाहाकार माजवला आहे. गेल्या २४ तासांत ३५४ नव्या रुग्णांची भर पडली असून देशभरात करोनाग्रस्तांची संख्या ४,४२१ वर पाहोचली आहे. आता पर्यंत ११४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, ३२६ रुग्ण बरे झाले आहेत. ही माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. करोना विषाणूशी लढण्यासाठी देशात २१ दिवसांचा लॉकडाउन सुरू आहे.

सरकारने जारी केले हेल्पलाइन नंबर

कोरोनाशी संबंधित माहिती मिळवण्यासाठी सरकारने हेल्पलाइन नंबर जारी केला आहे. माहितीसाठी +९१-११-२३९७८०४६ या क्रमांकावर फोन करून माहिती घेता येईल. या व्यतिरिक्त राज्य सरकारांनी देखील हेल्पलाइन नंबर जारी केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.