
चंद्रपूर (का.प्र.)कोविड-१९ या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र लॉकडाऊन करण्यात आलेला आहे. लॉकडाऊनमुळे नागरिकांना घराबाहेर निघणे यावर बंधन आहेत. हे सर्वज्ञात असतांना गरीब ज्या स्लम वसाहतीत राहणाèया दाट वस्तीत रूग्ण तपासणी व उपचार फार जरूरी आहे. अशा वसाहतीत सेवारत वैद्यकीय सेवा देणारे सर्व ज्यात अॅलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेद, इलेक्ट्रोहोमिओपॅथी, युनानी, नॅचरोपॅथी व अन्य प्रॅक्टीस करणारे डॉक्टर्स मंडळींनी आपआपल्या कार्यक्षेत्रात घरोघरी जाऊन आजाराबद्दल विचारणा करून २ तास सेवा देवून उपचार करावे व तसा क्षेत्राचा अहवालही तयार करून जिल्हा प्रशासनास दिल्यास रूग्णांची माहिती उपलब्ध होऊन मनपा, जि.प., पं.स., आरोग्य सेवा, नगर परिषद व जिल्हा प्रशासनाला प्रत्यक्ष सहयोगच होईल.
अशा सुचना पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी आहे. पत्राद्वारे जिल्हाधिकारी यांना केल्या आहेत. अशा डॉक्टर्सची मदत घेण्याकरीता संबंधित विविध डॉक्टर्स असोसिएशन सोबत बैठकी घेऊन अशा आशयाचे निर्देश दिल्यास स्थितीचा अहवाल सोबत रूग्णांना अशा काळात घरपोच आरोग्यसेवाही मिळेल. जे डॉक्टर्स स्लम भागात घरोघरी जाऊन गरीबांना रूग्णसेवा देतील अशांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात यावे असेही हंसराज अहीर यांनी म्हटले


